राज ठाकरेंना दिलासा! 'त्या' आंदोलन प्रकरणातील अजामीनपात्र वॉरंट रद्द

सन २००८ मध्ये भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसेतर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आलं होतं.
राज ठाकरेंना दिलासा! 'त्या' आंदोलन प्रकरणातील अजामीनपात्र वॉरंट रद्द
Raj ThackeraySaam TV

सांगली : सांगलीच्या इस्लामपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयानें राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे वॉरंट रद्द केलं आहे. या अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली. मात्र, कोर्टात ज्यावेळी कोर्ट निर्देश देईल त्यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे हजर राहावे, असे सुनावणी वेळी कोर्टाने म्हंटले आहे.

सन २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) स्थापना झाल्यानंतर सन २००८ मध्ये भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसेतर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आलं होतं. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांना रत्नागिरी येथे अटक करून कल्याण न्यायालयात नेण्यात आले होतं.

त्यामुळे महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करून अनेक ठिकाणी बंद पुकारला होता. यावेळी सांगलीच्या (Sangli) शिराळामध्ये मनसेच्या तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून राज ठाकरे, तानाजी सावंतांसह काही जणांवर गुन्हे दाखल झाले होते.

हे देखील पाहा -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे वॉरंट देऊनही हजर न राहिलेने न्यायालयाने (Court) त्यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वारंटचे आदेश जारी केला होता. म्हणून न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश केला होता. त्यानुसार शिराळा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात नियमित फौजदारी खटला सुनावणी झाली. यामध्ये राज ठाकरे हे आरोपी क्रमांक ९ शिरीष पारकर हे आरोपी क्रमांक दहा म्हणून समाविष्ट आहेत.

यापूर्वी या दोघांनाही न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटचा आदेश केला होता. त्याप्रमाणे शिरीष पारकर यांनी न्यायालयात हजर राहून जामीन दिला. यावेळी न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध केलेला अजामीनपात्र वॉरंटचा आदेश रद्द केला.

तसंच राज ठाकरे हे वारंट हुकूम होऊनदेखील न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कु. पी.ए. श्रीराम यांनी दिला होता. दरम्यान ठाकरे यांच्या वकिलांनी इंस्लामपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात रिट दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली असून न्यायालयाने आता राज ठाकरे यांचे वॉरंट रद्द करण्यात आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com