
- कैलास चाैधरी
तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिरात (tuljabhavani mandir) छत्रपती संभाजीराजे (yuvraj sambhajiraje chhatrapati) यांच्या अवमान प्रकरणी मंदिर तहसीलदार योगिता कोल्हे (yogita kolhe) व सहायक धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे (nagesh shitole) यांना प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आपल्यावर प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये ? असे नोटीसीत नमूद केले करण्यात आले आहे. (sambhajiraje chhatrapati latest marathi news)
छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थानकडून गाभाऱ्यात दर्शन देण्यासाठी अडवल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. छत्रपतींनी स्वतः जिल्हाधिकारी यांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती देत त्यांची देखील कानउघडणी केली हाेती.
छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य जेव्हा तुळजाई नगरीतील भवानी मातेच्या (shri bhavani devi) दर्शनास येतात. तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात. मात्र शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याने संभाजीराजे छत्रपती नाराज झाले होते. याप्रकरणी मंदिर संस्थांनने परिपत्रक काढत दिलगिरी व्यक्त केली. तरी देखील नागरिक तहसीलदार आणि व्यवस्थापक यांच्यावर कारवाईच्या मागणीवर ठाम आहेत.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.