औरंगाबाद: आधी घरांवर बुलडोझर फिरवला, आता पुनर्वसनाबाबत विभागीय आयुक्तांनी दिला शब्द

लेबर कॉलनीत राहणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाबाबत प्रशासनाला सूचना
औरंगाबाद: आधी घरांवर बुलडोझर फिरवला, आता पुनर्वसनाबाबत विभागीय आयुक्तांनी दिला शब्द
Aurangabad NewsSaam Tv

औरंगाबाद - शहरातल्या लेबर कॉलनीत राहणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाबाबत प्रशासनाला सूचना केल्या आहेत. जे खरेच बेघर आहेत, त्यांचं पुनर्वसन केलं जाईल, असं विभागीय सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी सांगितले. लेबर कॉलनीमध्ये राहत असलेल्या लोकांचा डेटा प्रशासनाकडे आहे. ज्या लोकांनी अजाणतेपणाने घर विकत घेतलं असेल, त्यांचा सकारात्मक विचार करून त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी पाऊल टाकलं जाईल. मात्र, जे लोक गुंडगिरी करून इथे घर मिळवले, त्यांचा प्रशासन बिलकुल विचार करणार नाही, ज्यांना घरं नाहीत, जे गरजू आहेत, त्यांची खात्री करून पुनर्वसनाबद्दल प्रशासन काम करेल अशी माहिती औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली आहे.

हे देखील पाहा -

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी लेबर कॉलनीतील घर पाडण्याच्या कारवाईनंतर पाहणी केली. अनेक दिवसांपासून ही कारवाई प्रलंबित होती. ही सगळी घरे धोकादायक होती. कधी ना कधी अपघात होईल असं वाटत होतं. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि महानगरपालिकेचे आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी कारवाई चांगल्या पद्धतीने केली असल्याचंही केंद्रेकर म्हणाले.

Aurangabad News
आता ट्रेनमध्ये काळजी न करता झोपणार आई आणि बाळ; रेल्वेने सुरू केली ही सेवा

शिवाय कायदेशीर कारवाईला येथील नागरिकांनी सहकार्य केले. आता ही जागा रिकामी झाल्यानंतर औरंगाबाद शहरातला सुदंर स्पॉट करू. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाला जागा कमी आहे; लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे इमारत उभी करण्यात येईल असेही केंद्रेकर यांनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.