Kolhapur: नव्या वर्षात सतेज पाटलांनी काेल्हापूरवासियांना दिली खूषखबर
satej patilsaam tv

Kolhapur: नव्या वर्षात सतेज पाटलांनी काेल्हापूरवासियांना दिली खूषखबर

सर्व बाबींची पूर्तता केल्यावर परवानगी देण्यात आली आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाला सोमवारी बेली कार्गो वाहतुकीसाठी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस) कडून मंजुरी मिळाली आहे. याबाबतची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी ट्विट करुन देत काेल्हापूर विमानतळ प्राधिकरणाच्या पाठपूराव्याबद्दल अभिनंदन केले आहे. (kolhapur airport received approval from the bureau of civil aviation security (BCAS) for belly cargo transport decleares guardian minister satej patil)

विमान चालकांना मालवाहतूक करण्यास परवानगी मिळावी यासाठी विमानतळ प्राधिकरणाने विमान वाहतूक मंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरीसाठी अर्ज केला होता. सर्व बाबींची पूर्तता केल्यावर परवानगी देण्यात आली आहे.

पाटील म्हणाले काेल्हापूर विमानतळावर (kolhapur airport) सुमारे ९१६ मीटर हवाई पट्टी आहे. ज्याचा येत्या काही महिन्यांत विस्तार केला जाणार आहे. आगामी काळात विमानतळावर नाईट लँडिंगलाही परवानगी मिळेल असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. ते म्हणाले बेली कार्गोला मान्यता ही आमच्यासाठी आनंददायीबाब आहे. ही सुरुवात आहे. विमानतळ आता अधिक गंतव्यस्थानांशी जोडले जाईल जिथे कार्गो शिपमेंट होईल. सांगलीची द्राक्षे, कोल्हापुरातील (kolhapur) औद्योगिक माल, कोकणातील (kokan) फळे लांबच्या ठिकाणी नेली जातील असेही पाटील यांनी नमूद केले.

satej patil
Chess: वयाच्या १४ व्या वर्षी Bharath Subramaniyam बनला भारताचा ७३ वा ग्रॅंडमास्टर

सध्या विमानतळावरुन दररोज सरासरी ६०० प्रवाशांसह आठ उड्डाणे हाेतात. बेली कार्गो सिस्टीमच्या बाबतीत सांगताना पाटील म्हणाले प्रवासी उड्डाणे देखील माल घेऊन जाऊ शकतात. हलक्या मालाच्या वाहतुकीची मागणी कोल्हापूर व आसपासच्या जिल्ह्यातील वाणिज्य व उद्योग संघटनांकडून करण्यात येत होती. बहुतांश देशांतर्गत हवाई मालवाहतूक बेली कार्गो पद्धतीने केली जाते आणि त्यामुळे महसूल मिळण्यास मदत होते असे पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.