Yerwada Police Station News: आता कैदी करु शकतील कुटूंबियांना व्हिडिओ कॉल; येरवडा कारागृहातून होणार सुरूवात

Prisoners can make video calls to their families: कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिकतेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे..
Yerwada Police Station
Yerwada Police StationSaamtv

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Yerwada Jail News: पुण्यातील येरवडा कारागृहासंबंधी एक मोठी आणि महत्वाची बातमी सध्या समोर येत आहे. पुण्याच्या येरवडा कारागृहातील कैदी लवकरच त्यांच्या घरच्यांना साधा वा व्हिडीओ कॉलही करू शकतील. कारागृहातील कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिकतेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत असून लवकरच या उपक्रमाला सुरूवात होणार आहे.( Prisoners Can make video calls to family members from jail)

Yerwada Police Station
Air India News: धक्कादायक! चालू विमानामध्ये पतीने पत्नीचा गळाच आवळला; एयर इंडियाच्या विमानातील थरार

याबाबत अधिक माहिती अशी की, कैद्यांना भेटण्यासाठी राज्यातील सगळ्यात कारागृहांमध्ये नाते व त्यांची मोठी गर्दी होत असते. तसेच कैद्यांना त्यांच्या बराखीतून कॉइन बॉक्स पर्यंत न्यावे लागते ते सुरक्षेच्या दृष्टीने जोखमीचे ही ठरू शकते. त्यामुळे मोबाईल फोन द्वारे संभाव्य धोका कळू शकतो, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या उपक्रमाची लवकरच येरवडा (Yerwada) कारागृहातून सुरूवात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर याला सुरुवात करण्यात येईल आणि टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्वच कारागृहात ही सुविधा दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Yerwada Police Station
Chandur Railway Krushi Utpanna Bazar Samiti News : चांदूर रेल्वे बाजार समिती पदाधिकारी निवडी बिनविराेध; गणेश आरेकर, रवींद्र देशमुखांची वर्णी

कैद्यांना दिले जाणारे मोबाइल सेट हे कारागृह प्रशासनाच्या (Police) ताब्यात असतील व केवळ कॉलसाठी ते त्यांच्याकडे दिले जाणार आहेत. सध्या येरवडा कारागृहातील कैद्यांना फक्त आठवड्यातून १० मिनिटे कुटूंबियांशी बोलण्याची परवानगी आहे. मात्र त्यांना एकमेकांना पाहता येत नाही. याच गोष्टीचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com