अलिबागमध्ये ओबीसी बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनओक्रोश आंदोलन...

ओबीसी बांधवांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश करत आपला निषेध व्यक्त केला आहे. तर 27 डिसेंबर रोजी आझाद मैदानावरही आंदोलन करणार आहेत.
अलिबागमध्ये ओबीसी बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनओक्रोश आंदोलन...
अलिबागमध्ये ओबीसी बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनओक्रोश आंदोलन...राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्याबाबत ओबीसींमध्ये नाराजीचा सूर पसरलेला आहे. राजकीय आरक्षण रद्द झाल्याबाबत राज्यभर आज जन आक्रोश आंदोलन होत आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी बांधवांनी सरकार विरोधात जन आक्रोश आंदोलन करून निदर्शने केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. (OBC brothers protest in front of District Collector's office in Alibaug)

हे देखील पहा -

ओबीसींच्या (OBC) मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री मुख्यमंत्री यांना देण्यासाठी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे निवेदन दिले. केंद्र आणि राज्य सरकारने याबाबत योग्य पावले उचलली नाहीत तर पुढील काळात जड जाईल असा इशाराही आंदोलनाच्या (Agitation) माध्यमातून देण्यात आला आहे. 27 डिसेंबर रोजी आझाद मैदान येथे भव्य मोर्चा काढून आंदोलन केले जाणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com