महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणाची काळजी : नाना पटोले

राजकारणापलिकडे जाऊन हे आरक्षण मिळवायचं आहे
महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणाची काळजी  : नाना पटोले
महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणाची काळजी : नाना पटोलेSaam tv

पुण्यातील (Pune) ओबीसी समाजातील (OBC) काही लोक मला भेटायला आले होते. ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) ओबीसी समाजातील लोकांच्या भावना तीव्र आहेत. बारामती केंद्रस्थानी असल्यामुळे त्यांनी बारामतीत (Baramati) ओबीसी आरक्षणासाठी परिषद घेण्याची मागणी केली. या मागणीनंतर मी २९जुलै रोजी ओबीसी आरक्षणासंबंधी होणाऱ्या परिषदेला जाणार असल्याची माहिती यावेळी नाना पटोले यांनी दिली. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आज नाना पटोले यांच्या नेतृत्त्वात हँगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत सायकल रॅली काढली. (Mahavikas Aghadi cares about OBC reservation: Nana Patole)

महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणाची काळजी  : नाना पटोले
राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा ठाकरे सरकारचा डाव- प्रविण साले

त्यानंतर कॉंग्रेस नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बारामती केंद्रस्थानी असल्यामुळे त्यांनी बारामतीत ओबीसी आरक्षणासाठी परिषद घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे यात कोणीही चुकीचा अर्थ घेऊ नये, ही परिषद केंद्रसरकारविरुद्ध असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणाची काळजी आहे. राजकारणापलिकडे जाऊन हे आरक्षण मिळवायचं आहे. त्यासाठी केंद्रसरकारकडून इम्पेरिकल डेटा मिळवण्यासाठी भाजप नेत्यांची मदत होईल. भुजबळ साहेबांच्या वतीने आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी भुजबळांनी फडणवीसांनी भेट घेतली असल्याचे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले आहे.

तसेच, महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष चालणार. शरद पवार हे आमचे नेते आहेत, ते राज्याचे नेते आहेत. पवार साहेबांच्या मार्गदर्शनात सरकार चालू आहे. त्यांच्या हातात रिमोट कंट्रोल आहे. भाजपनेते राज्यात अस्थिरता निर्माण करण्यासाठी काहीही म्हणत असतात आणि विधानसभेत ते गोंधळ घालत असतात. राष्ट्रपती राजवट लागू करू अश्या धमक्या देतात, असे म्हणत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com