ओबीसींचे शैक्षणिक आरक्षणही धोक्यात - रेखा ठाकूर

न्यायालयाच्या ओबीसी राजकीय आरक्षणाच्या निर्णयासोबतच ओबीसी समाजाचे शैक्षणिक आरक्षण देखील धोक्यात येऊ शकते, असे भाकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केले आहे.
ओबीसींचे शैक्षणिक आरक्षणही धोक्यात - रेखा ठाकूर
ओबीसींचे शैक्षणिक आरक्षणही धोक्यात - रेखा ठाकूरजयेश गावंडे

अकोला - ओबीसी आरक्षणासंदर्भात व ओबीसी जनगणनेच्या बाबतीत भाजप आणि सत्तेतील महाविकास आघाडी सरकार काहीच करण्यास तयार नाही. याबाबत भाजप आणि सत्तेतील सरकार हे उदासीन आहे. या पक्षांना ओबीसी आरक्षण नको आहे, असे त्यांचे एकूणच वर्तन आहे. न्यायालयाच्या ओबीसी राजकीय आरक्षणाच्या निर्णयासोबतच ओबीसी समाजाचे शैक्षणिक आरक्षण देखील धोक्यात येऊ शकते, असे भाकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केले आहे. OBC's educational reservation also in danger - Rekha Thakur

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर मुंबई येथील खासगी बायपास सर्जरी करण्यात आली आहे. त्यापूर्वी ॲड.आंबेडकर यांनी वंचितच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी रेखा ठाकूर यांच्याकडे सोपविली होती. त्यामुळे वंचितच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या विदर्भ दौऱ्याला आज शनिवार पासून अकोला येथून सुरुवात केली आहे.

हे देखील पहा -

यानिमित्ताने येथे आयोजित पत्रकार परिषदेत रेखाताई ठाकूर यांनी ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण आता सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांसह यापूर्वी सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांमुळेच धोक्यात आल्याचा आरोप केला. वेळीच ओबीसी प्रवर्गातील मतदार जागृत न झाल्यास त्यांचे शैक्षणिक आरक्षणही संपुष्ठात येऊ शकते, असेही त्या यावेळी म्हणाल्या. पत्रकार परिषदेला वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.धैर्यवर्धन पुंडकर, अरूंधती सिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रभा शिरसाट, प्रदीप वानखडे, निलेश विश्वकर्मा, राजेंद्र पातोडे, वंदना वासनिक, प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे, डाॅ. प्रसन्नजित गवई यांच्यासह पदाधिकारीही उपस्थित हाेते.

ओबीसींचे शैक्षणिक आरक्षणही धोक्यात - रेखा ठाकूर
बसस्थानकात कपडे काढून धिंगाना! प्रकार कॅमेरात कैद

राजकीय हस्तक्षेपामुळेच जि.प.च्या निवडणुका स्थगित

कोरोनाच्या काळातही पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात, तर राज्यात जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सुद्धा त्या स्थगित करण्यात येतात. केवळ राजकीय हस्तक्षेपामुळेच या निवडणुका स्थगित करण्यात आल्याचा आरोप सुद्धा रेखा ठाकूर यांनी यावेळी केला.

आगामी निवडणुकीत लहान पक्षांना सोबत घेणार

राज्यातील आगामी महापालिकेच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार आहे. परंतु समविचारी लहान पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा आहे. त्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com