शरद पवारांबाबत आक्षेपार्ह ट्वीट; नाशिकचा तरुण पोलिसांच्या जाळ्यात

दोन दिवसांपूर्वी निखिल भामरे नावाच्या व्यक्तीने शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केले होते.
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह ट्वीट; नाशिकचा तरुण पोलिसांच्या जाळ्यात
Sharad PawarSaam TV

नाशिक - शरद पवारांबाबत (Sharad Pawar) आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घटले आहे. दोन दिवसांपूर्वी निखिल भामरे नावाच्या व्यक्तीने शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केले होते. या तरुणाविरोधात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही निषेध करून चौकशी करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणी नाशिक ग्रामीणच्या दिंडोरी पोलिसांनी कारवाई करत निखिल भामरेला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. निखिल भामरेची पोलिसांकडून सुरू चौकशी आहे. तसेच निखिलच्या मोबाईलमध्ये आणखी काही आक्षेपार्ह मजकूर आढळल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

हे देखील पाहा -

निखिल भामरेचे ट्विट काय आहे

शेअर केलेल्या ट्वीटच्या स्क्रिनशॉमध्ये निखिल भामरेच्या 'वेळ आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची' असा मजकूर लिहिलेला आहे. याचा स्क्रिनशॉट जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत शेअर केला आहे.

 Sharad Pawar
प्रवीण दरेकर यांच्या विरोधात 904 पानी आरोपपत्र; 'या' दोघांच्या नावाचाही समावेश

ट्विट करत काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, काय पातळी वर हे सगळे होते आहे ... ह्या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा अशी मागणी केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.