बाबो! महिला तलाठ्यानेचं चोरला मोबाईल!... (पहा व्हिडीओ)

अकोल्यातील पेट्रोल पंपावरून मोबाईल चोरताना एक महिला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
बाबो! महिला तलाठ्यानेचं चोरला मोबाईल!... (पहा व्हिडीओ)
बाबो! महिला तलाठ्यानेचं चोरला मोबाईल!... (पहा व्हिडीओ)जयेश गावंडे

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील Akola पेट्रोलपंपावरून मोबाईल Mobile चोरताना एक महिला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आणि विशेष म्हणजे मोबाईल चोरणारी महिलाही तलाठी या पदावर नोकरीवर आहे. सीसीटीव्हीच्या CCTV आधारे पोलिसांनी महिला तलाठीला अटक करून तिच्याकडून चोरीचा मोबाइल जप्त केला आहे. गायत्री सुनील कोरडे {रा. मलकापूर} असे आरोपी महिलेचे नाव आहे.

विशेष म्हणजे सदर महिला ही अकोला तालुक्यातील म्हैसांग येथे तलाठी पदावर कार्यरत आहे. चोरीची ही घटना ६ एप्रिल २०२१ रोजी दुपारी घडली होती. अकोल्यातील अग्रसेन चौकातील पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्यांचा मोबाइल पेट्रोलपंप व्यवहारासाठी पेट्रोल भरण्याच्या जागी ठेवला होता. याच मोबाइलमध्ये फोन पे द्वारे ग्राहकांकडून आलेले पैसे जमा करण्यात येत होते.

पेट्रोल Petrol भरण्यासाठी आलेल्या एका महिलेने तो मोबाइल उचलला आणि पेट्रोल भरून निघून गेली. मोबाइल दिसून न आल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर महिला मोबाइल उचलताना व एक इसम दिसून आले. त्यानंतर रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध भादंविचे कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला होता.

बाबो! महिला तलाठ्यानेचं चोरला मोबाईल!... (पहा व्हिडीओ)
Mumbai: कोरोनानंतर आता डेंग्यूच्या रुग्णसंख्येत अधिक वाढ

या गुन्ह्याचा तपास ठाणेदार नितीन शिंदे यांनी तपासात घेत सदर महिलेचा शोध घेतला असता आरोपी महिला ही गायत्री सुनील कोरडे, म्हैसांग येथे तलाठी असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिला अटक केली. तिच्याकडून पोलिसांनी मोबाइल जप्त केला आणि तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन शिंदे यांनी दिली. नोकरीवर कार्यरत असलेल्या महिलेला मोबाइल चोरीच्या आरोपात अटक करण्यात आल्याने या प्रकरणाची सध्या जिल्हाभर चर्चा आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com