लग्नाचं अमिष दाखवत अनेकदा ठेवले शारीरिक संबंध; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात...

फिर्यादीनुसार आरोपी इरफान शेख याने फिर्यादी युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला आणि अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले.
लग्नाचं अमिष दाखवत अनेकदा ठेवले शारीरिक संबंध; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात...
लग्नाचं अमिष दाखवत अनेकदा ठेवले शारीरिक संबंध; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात...दिलीप कांबळे

लोणावळा: युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करत वेगवेगळ्या ठिकाणी तिची इच्छा नसताना तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून (physical relations) नंतर फरार झालेल्या युवकाला लोणावळा पोलिसांनी (Lonavla Police) मोठ्या शिताफीने गजाआड (Arrest) केले आहे. अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव इरफान इस्माईल शेख असे आहे. संबंधित पीडित युवतीने लोणावळा (Lonavla) शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार आरोपी इरफान शेख याने फिर्यादी युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला आणि अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. (Lonavla Crime News in Marathi)

हे देखील पहा -

आरोपीने त्याच्या मित्राच्या रेल्वे गेट भांगरवाडी येथील रिकाम्या फ्लॅटवर फिर्यादी युवतीला बोलावून त्याठिकाणी तसेच नंतर डिसेंबर 2021 मध्ये चिंचवड येथील एका लॉजवर तिला घेवून जावून त्याठिकाणी तिच्याशी शरीर संबंध (Sex) ठेवले. तसेच तिला मारहाण आणि शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित युवतीने लोणावळा पोलिसांकडे धाव घेतली असता सदर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली. याप्रकरणी पुढील तपास लोणावळा पोलीस करीत आहे. (Often kept physical relations showing the lust of marriage Fugitive accused in lonavla police custody ab)

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.