सर्वसामान्य उपाशी, ऑईल कंपन्या मात्र तुपाशी

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या भावांमुळे सध्या सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. मात्र, दुसरीकडे ऑईल कंपन्या मात्र आश्चर्यकारक नफा कमवत आहेत.
सर्वसामान्य उपाशी, ऑईल कंपन्या मात्र तुपाशी
सर्वसामान्य उपाशी, ऑईल कंपन्या मात्र तुपाशीsaam tv

पुणे : गेल्या अडीच महिन्यांपासून पेट्रोल -डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा अक्षरशः खाली होत आहे. असे असले तरी दुसरीकडे मात्र ऑईल कंपन्या तुपाशी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, कारण देशातील प्रमुख तीनही ऑईल कंपन्यांनी कमावलेला नफा आश्चर्यकारक आहे , सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी याबाबतची आकडेवारी समोर आणली आहे.

हे देखील पहा -

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीने 2020-21 या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षापेक्षा 1600 टक्के नफा जास्त कमावला आणि भागधारकांना 120 टक्के लाभांशही दिलाय.
बीपीसीएल या कंपनीने 2020-21 या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षीच्या पेक्षा 610 टक्के नफा जास्त कमावला, आणि भागधारकांना 790 टक्के लाभांशही दिला. एचपीसीएल या कंपनीने 2020-21 या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षीच्या पेक्षा 300 टक्के नफा जास्त कमावला आणि भागधारकांना 227.5 टक्के लाभांशही दिला

सर्वसामान्य उपाशी, ऑईल कंपन्या मात्र तुपाशी
ओबीसींचे शैक्षणिक आरक्षणही धोक्यात - रेखा ठाकूर

कोरोनानंतर बाकी बहुतांश क्षेत्रातील कंपन्यांची स्थिती खालावली असताना ऑइल कंपन्या घवघवीत नफा कमवत आहे यावरुन या कंपन्यांची पाचही बोटे तुपात असल्याचे स्पष्ट दिसतंय. या कंपन्यांचे बहुतांश शेअर्स केंद्र सरकारच्या मालकीचे असल्याने लाभांशाचा सर्वाधिक लाभ त्यांनाच मिळत असल्याने तेही खूश आहेत. अर्थात हे सर्व ज्या सामान्य माणसाच्या जिवावर चाललंय तो मात्र निमूटपणे वाढत्या किमतीचे चटके सोसतो आहे. एका बाजूला केंद्र व राज्य सरकार भरमसाठ कर लावत आहे तर दुसरीकडे ऑइल कंपन्या भरमसाठ नफा कमावत आहेत आणि करोना संकटामुळे मेटाकुटीला आलेली जनता मात्र रोज होणारी दरवाढ असहाय्यपणे सोसत आहे

Edited by: Ashwini jadhav kedari

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com