Breaking: औरंगाबादमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव !

देशासह जगाची झोप उडवणारा ओमिक्रॉन (Omicron Variant) सध्या धुमाकूळ घालतोय. आता त्याचा धसका औरंगाबादला (Aurangabad) देखील बसला आहे.
बुलडाण्यात ओमिक्रॉनचा शिरकाव
बुलडाण्यात ओमिक्रॉनचा शिरकावSaam Tv

अविनाश कानडजे

औरंगाबाद : देशासह जगाची झोप उडवणारा ओमिक्रॉन (Omicron Variant) सध्या धुमाकूळ घालतोय. आता त्याचा धसका औरंगाबादला (Aurangabad) देखील बसला आहे. काल महाराष्ट्रामध्ये नव्याने सहा रुग्णांची भर पडली आहे. हा रुग्ण इंग्लंड मधून औरंगाबादमध्ये आले होता. त्यानंतर तेथून मुंबईत (Mumbai) गेलेल्या नागरिकाचा ओमिक्रॉनचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हे देखील पहा-

मात्र, जिल्ह्यात पाहिला रुग्ण आढळून आल्याने औरंगाबाद मधील आरोग्य यंत्रणा आता चांगलीच अलर्ट झाली असून, रुग्ण ज्यांच्या संपर्कात आला आहे त्यांना आणि रुग्णाच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन केले गेले आहे. हा रुग्ण सध्या मुंबईतील सेवन हिल रूग्णालयात विलीनीकरण कक्षामध्ये असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या प्रसिद्धीपत्रकमध्ये देण्यात आली आहे.

बुलडाण्यात ओमिक्रॉनचा शिरकाव
"उद्धव ठाकरे यांचं सरकार उद्धट सरकार; मंत्री पैसे मोजण्यात व्यस्त"

तसेच मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णाने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्हीही डोस घेतले असल्यामुळे त्याची प्रकृती सध्या चांगली आहे. मागच्या काही दिवसांपासून औरंगाबाद आणि मराठवाड्याची परिस्थिती जर पाहिली तर कोरोनाची आकडेवारी कमी झालेली दिसून आली होती. काल मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये फक्त बारा रुग्ण आढळून आले होते. तर काल पूर्ण मराठवाड्यामध्ये एकही मृत्यू झालेला नाही. मात्र औरंगाबादेतून गेलेला रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आल्यामुळे औरंगाबादकरांची धास्ती आता वाढली आहे.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com