Osmanabad : मला श्रेय नको म्हणून राणाजगजिसिंह पाटलांनी वैद्यकीय प्रवेश रखडवले : ओमराजे

वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रेयवादावरुन सध्या दाेन्ही नेत्यांत जुंपल्याचे चित्र आहे.
Omprakash Rajenimbalkar , ranajagjitsinha patil , Osmanabad
Omprakash Rajenimbalkar , ranajagjitsinha patil , Osmanabadsaam tv

- कैलास चाैधरी

Omprakash Rajenimbalkar News : दुसऱ्याचे लेकरू उचलायचे आणि बगलत मारायचे अन् विचारायचे कसे काय आपले आहे ही यांची सवय. पण लेकराचे तोंड बघितले की बघाणाऱ्याला कळतं मुलगा आणि बापातला फरक अशी टीका खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भाजपा (bjp) आमदार राणाजगजिसिंह पाटील (ranajagjitsinha patil) यांच्यावर त्यांचे नाव न घेता उस्मानाबाद येथे केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रेयवादावरुन सध्या दाेन्ही नेत्यांत जुंपल्याचे चित्र आहे. (Osmanabad Latest Marathi News)

ओमराजे म्हणाले वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबादला कोणी मंजूर केले हे सगळ्यांना माहित आहे. मात्र ओमराजेला श्रेय नको म्हणून वैद्यकीय महाविद्यालयचे प्रवेश रखवडवले असून पीक विमाच्या बाबतीत ही असेच घडले आहे. पीक विमा बाबत पहिली याचिका शिवसेनेने केली मात्र त्याचे श्रेय राणा पाटील घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सन 2020 खरिपचा पीक विमा आणि वैदयकीय महाविद्यालय या श्रेय वादावरून दोन्ही बाजू एकमेकांना समोर येताना दिसत आहेत. आता ओमराजे यांनी केलेल्या टीकेला राणा पाटील काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Omprakash Rajenimbalkar , ranajagjitsinha patil , Osmanabad
Amravati : शिवाजी शिक्षण संस्था निवडणुकीत राडा; मी इथंच थांबणार, आमदार भुयार म्हणाले...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com