Breaking Yavatmal : शिवसेना महिला पदाधिकाऱ्याने धमकवल्याने एकाची आत्महत्या!
Breaking Yavatmal : शिवसेना महिला पदाधिकाऱ्याने धमकवल्याने एकाची आत्महत्या!संजय राठोड

Breaking Yavatmal : शिवसेना महिला पदाधिकाऱ्याने धमकवल्याने एकाची आत्महत्या!

मात्र, सदर महिलेचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही ती कुठलीही पदाधिकारी नसल्याचा खुलासा शिवसेनेच्या महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख संजीवनी शेरे यांनी केला आहे.

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील नगर परिषद मधील सफाई कामगार अनिल अशोक उबाळे यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक विडिओ शूट केला व तो समाज माध्यमावर व्हायरल झाला. त्यात त्यांनी दिग्रस येथील शिवसेनेच्या महिला उपशहर प्रमुख अर्चना अरविंद राठोड ही महिला मला वारंवार शारीरिक, मानसिक आर्थिक त्रास देत असून माजी मंत्री संजय राठोड यांच्या नावाने धमकावत माझ्या कडून पैशाची मागणी करत असल्याचा आरोप व्हिडिओतून केला आहे.

हे देखील पहा :

आता या व्हिडीओमुळे जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृत अनिल यांच्यावर अंत्यसंस्कार केल्या नंतर त्याच्या घरचे लोक आणि नातेवाईक पोलीस ठाण्यावर धडकले. त्यांनी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. या प्रकरणी मृतक अनिलच्या पत्नी च्या तक्रारी वरून दिग्रस पोलिसांनी अर्चना अरविंद राठोड हिच्या विरुद्ध भादंवि कलम 306 व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सदर महिलेला अटक करण्यात येईल असे पोलिसांनी आश्वासन ठिय्या आंदोलन करणाऱ्यांना दिले आहे. सदर महिला ही शिवसेनेची पदाधिकारी असल्याचे अनिलने आपल्या व्हिडिओत सांगितले.

Breaking Yavatmal : शिवसेना महिला पदाधिकाऱ्याने धमकवल्याने एकाची आत्महत्या!
Breaking Buldhana : धक्कादायक! चुलत भावाच्या मदतीने मुलीने केला जन्मदात्या बापाचा खून

मात्र, सदर महिलेचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही ती कुठलीही पदाधिकारी नाही ती फक्त 1 महिन्याआधी सामाजिक कार्यक्रमामध्ये स्वतःहून हजर झाली होती. ती संजय राठोड यांना भेटायला आली होती. आमचा तिच्याशी काहीही संबंध नाही. तसेच ती शिवसेनेची पदाधिकारी नाही तसेच शिवसेनेची सदस्य देखील नाही. त्यामुळे तिच्यावर योग्य ती कारवाई करावी असा खुलासा शिवसेनेच्या महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख संजीवनी शेरे यांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस तक्रारीत सदर महिला शिवसेनेची पदाधिकारी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ती त्याच जोरावर अनिल यांना ब्लॅकमेल करत होती. या प्रकरणातील इतर महत्वाच्या व तथ्यपूर्ण गोष्टी पोलीस तपासानंतर समोर येतील.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com