अकोल्यातील अकोट मध्ये एका दिवसाची संचारबंदी!

अमरावतीमध्ये मुस्लिम समाजाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारांनंतर अकोल्यातील अकोट शहरातील हनुमान नगर, नवगाजी प्लॉट येथे अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली.
अकोल्यातील अकोट मध्ये एका दिवसाची संचारबंदी!
अकोल्यातील अकोट मध्ये एका दिवसाची संचारबंदी!जयेश गावंडे

अकोला : अमरावती च्या घटनेनंतर अकोल्यातील अकोट शहरातील हनुमान नगर, नवगाजी प्लॉट येथे अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये एक चार चाकीसह काही मोटरसायकल आणि विद्युत मीटर सह घरांना लक्ष्य केंद्रित करण्यात आले होते. यामध्ये एका अपंग बांधवांचे सायकलचे सुद्धा नुकसान झाले. पोलीस वेळीच दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.

हे देखील पहा :

त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून अकोल्यातील अकोट मध्ये 24 तासांची संचारबंदी प्रशासनाने जाहीर केलीय. तर संपूर्ण अकोट शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अकोट उपविभागातील सर्व ठाणेदारांना पाचारण करण्यात आले. दरम्यान दगडफेकी प्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

अकोल्यातील अकोट मध्ये एका दिवसाची संचारबंदी!
Gadchiroli : आणखी तीन नक्षली नेत्यांना कंठस्नान? पोलिसांना मोठं यश!

तर पोलीस प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवत असून सोशल मीडियावर चुकीची माहिती फारवर्ड करणाऱ्यांकडे पोलिस स्टेशनचे बारीक लक्ष असून कोणीही अफवा फैलू नये. सध्या स्थितीत वातावरण शांत असून नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे. अशी कोणतीही अपरिचित घटना घडल्यास 112 नंबर वर कॉल करावे असे आव्हाहन जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com