मोहाळी नदीच्या पाण्यात पडून एकाचा मृत्यू; घातपाताची शक्यता

या नदीला केवळ एक फुटापर्यंत पाणी असल्याने ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मोहाळी नदीच्या पाण्यात पडून एकाचा मृत्यू; घातपाताची शक्यता
DrownSaam TV

अकोला- अकोट तालुक्यातल्या वणी वारुळा येथील मोहाळी नदीच्या पात्रात वणी येथील राजेंद्र पळसपगार हा युवक दारु पिऊन घरी जात असताना मोहाळी नदीच्या (River) पात्रात पडुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या नदीला केवळ एक फुटापर्यंत पाणी असल्याने ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी (Police) व्यक्त केला आहे. या मृत्यू बद्दल वणी वारुळा येथे तर्क वितर्क काढण्यात येत आहेत.

हे देखील पाहा -

सदर मृतदेहावर कोणत्याही प्रकारचा मार अथवा जखम नव्हती त्यामुळे नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेणार आहेत. सदर घटनेची माहिती अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आली असता घटनास्थळी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख यांच्या सह पोलीस दाखल झाले होते.

Drown
बंगाली स्टाइलमध्ये अशी बनवा टोमॅटो-मनुक्याची चटणी

रात्री उशिरा याचा तपास सुरू होता. दरम्यान मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. या मृत्युची चर्चा वाऱ्या सारखी परीसरात पसरली असता घटनास्थळी अनेक लोकांची गर्दी झाली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com