Maharashtra Corona Update : कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर माहिती

कोरोना मृतांचा आकडा स्थिर असून सक्रिय रुग्णांची संख्या १०४९ वर पोहोचली आहे.
Maharashtra Corona Update : कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर माहिती
Corona News UpdatesSaam Tv

मुंबई : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ (corona new patients) होत असून पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज बुधवारी १८८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून शून्य कोरोना रुग्णांच्या (Zero corona death) मृत्यूची नोंद झालीय. त्यामुळे कोरोना मृतांचा आकडा स्थिर असून सक्रिय रुग्णांची संख्या १०४९ वर पोहोचली आहे. तसंच आज बुधवारी १६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोनातून बरे (corona free patients) झालेल्या रुग्णा्ंची संख्या ७७,२९,४६९ वर गेली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनातून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.११ टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर कोरोना मृत्यूदर १.८७ टक्के इतका झाला आहे. दरम्यान, आजपर्यंत लॅबमध्ये पाठवलेल्या ८,०२,७०,६९६ नमुन्यांपैकी ७८,७८,३६३ नमुने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.

Corona News Updates
माझी पत्नी आणि मुलगा घरी आहे, पोलिसांना एवढेच सांगतो...; संदीप देशपांडेंची Video पोस्ट

या विभागात नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई विभाग : MCGM, ठाणे, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई, केडीएमसी, उल्हासनगर महानगरपालिका, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, पालघर, वसई-विरार महानगरपालिका, रायगड, पनवेल महानगरपालिका - १३८ नवे कोरोना रुग्ण

नाशिक विभाग - नाशिक, नाशिक महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका, अहमदनगर, अहमदनगर महानगरपालिका, धुळे, धुळे महानगरपालिका, जळगाव, जळगाव महानगरपालिका, नंदुरबार- २ नवे कोरोना रुग्ण

पुणे विभाग - पुणे, पुणे महानगरपालिका, PCMC,सोलापूर, सोलापूर महानगरपालिका, सातारा - ४१ नवे कोरोना रुग्ण

कोल्हापूर विभाग - कोल्हापूर, कोल्हापूर महानगरपालिका, सांगली, सांगली महानगरपालिका, सिंधुदुर्ग, रत्नागिरी - २ नवे कोरोना रुग्ण

औरंगाबाद विभाग : औरंगाबाद, औरंगाबाद महानगरपालिका, जालना, हिंगोली, परभणी, परभणी महानगरपालिका- 0 नवे कोरोना रुग्ण

लातूर विभाग : लातूर, लातूर महानगरपालिका, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड महानगरपालिका - 0 नवे कोरोना रुग्ण

अकोला विभाग : अकोला, अकोला महानगरपालिका, अमरावती, अमरावती महानगरपालिका, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम - १ नवा कोरोना रुग्ण

नागपूर विभाग : नागपूर, नागपूर महानगरपालिका, वर्धा, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, चंद्रपूर महानगरपालिका, गडचिरोली - ३ नवे कोरोना रुग्ण

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.