Sambhajinagar Adarsh Scam : मुलीच्या शिक्षणासह लग्नासाठी 'आदर्श' मध्ये अडकले लाखाे रुपये, ठेवीदारानं संपवलं जीवन

ही रक्कम एकूण 22 लाख 50 हजार रुपये एवढी आहे.
chhatrapati sambhaji nagar
chhatrapati sambhaji nagarsaam tv

- नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला. या घोटाळ्यामुळे आपले लाखाे रुपये बुडाल्याच्या भीतीने एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची चर्चा सुरु आहे. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत. (Maharashtra News)

chhatrapati sambhaji nagar
Bhusaval-Daund MEMU Weekly Special Train : रेल्वे प्रवाशांनाे ! भुसावळ-दौड-भुसावळ मेमू ट्रेन रद्द; जाणून घ्या कारण (पाहा व्हिडिओ)

छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर घाेटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये ठराविक ठेवीदारांना नियमबाह्य कर्जाची खैरात वाटली असे म्हटलं आहे. आदर्श ग्रुप अंतर्गत येणाऱ्या जवळपास १५ संस्थांना ते वाटप केले. तर काही नातेवाईक, ओळखींच्या नावे कर्ज उचलले गेल्याची चर्चा आहे. त्याबाबत पाेलिसांत 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

chhatrapati sambhaji nagar
Tomato Prices : टाेमॅटाेच्या वाढत्या दरांना लागणार ब्रेक, किसान सभेचा 'या' निर्णयास विराेध (पाहा व्हिडिओ)

दरम्यान या पतसंस्थेत 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने एका 38 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. ही घटना संभाजीनगर तालुक्यातील लाडगाव येथे घडली आहे. रामेश्वर नारायण इथर असे मृताचे नाव आहे.

chhatrapati sambhaji nagar
PSI Success Story: शेतमजुर मुलगा पीएसआय हाेताच आई-वडिलांना आनंदाश्रू अनावर...

रामेश्वर यांनी मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाची तजवीज म्हणून ही रक्कम पतसंस्थेत जमा केली होती. रामेश्वर यांचे वडील नारायण यांच्या नावे साडेआठ लाख रुपये, आई कासाबाई यांच्या नावे नऊ लाख रुपये आणि मुलगी अश्विनीच्या नावे पाच लाख रुपयांच्या ठेवी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवल्या गेल्या आहेत.

ही रक्कम एकूण 22 लाख 50 हजार रुपये एवढी आहे. रामेश्वर यांनी चिंतेतून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. पाेलिस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com