Malegoan Crime News : सटाणा नाका भागात बंदूकीचा धाक दाखवत युवकांनी लुटले लाख रुपये

या घटनेमुळे परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे.
malegoan, crime news
malegoan, crime newssaam tv news

- अजय सोनवणे

Malegoan Crime News : मालेगाव (malegoan) शहराच्या भर वस्तीत आलेल्या सटाणा नाका भागातील कलंत्री गॅस एजन्सीमध्ये तोंडाला रुमाल बांधून घुसलेल्या दोन अज्ञात चोरांनी कर्मचाऱ्यांना पिस्टल व चाकू दाखवत एक लाखांची रोकड पळवली.

ही घटना भर वस्तीत सायंकाळी सहाच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान चोरीचा हा सर्व थरार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. साेमवारी सायंकाळच्या सुमारास पाऊस पडत असताना ही घटना घडली.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी - साेमवारी सायंकाळी पाऊस पडत हाेता. सटाणा नाका येथील कलंत्री गॅस एजन्सीमध्ये दाेन जण त्यांच्या तोंडाला रुमाल बांधून आले. ते दाेघेही तरुण हाेते. त्यांनी एजन्सीमधील कर्मचाऱ्यांना बंदूक दाखवत पैशांची मागणी केली. त्यानंतर सुमारे लाख रुपये घेऊन त्यांनी धूम ठाेकली. या घटनेनंतर पाेलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान सीसीटिव्हीच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

malegoan, crime news
राज्य स्पर्धेत शौचालयात जेवण तयार करुन दिलं खेळाडूंना; क्रीडाधिकारी निलंबित (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com