सेवा सोसायटीच्या विजयी मिरवणुकीत विराेधकांचा हल्ला; एक मृत्यूमुखी, तिघे गंभीर जखमी

शनिवारी सायंकाळी घडली घटना.
सेवा सोसायटीच्या विजयी मिरवणुकीत विराेधकांचा हल्ला; एक मृत्यूमुखी, तिघे गंभीर जखमी
Crime News, Nagar, Pathardi, DevraiSaam TV

नगर : अहमदनगर (nagar) जिल्ह्यातील पाथर्डी (pathardi) तालुक्यातील देवराई (devrai) गावातील सेवा सोसायटीच्या निवडणूकीनंतर दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत तिघे जण गंभीर जखमी (injured) झाले आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (nagar latest marathi news)

देवराई येथे शनिवारी सायंकाळी सेवा सोसायटीच्या निवडणुकीनंतर निघालेल्या विजयी मिरवणूकीत दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या निवडणुकीत विजयी गटाने काढलेल्या मिरवणुकीवर विरोधकांनी हल्ला केला. या हल्ल्यात अजय पालवे (ajay palve), विष्णू पालवे, मनोहर पालवे, वैभव पालवे, सुमन पालवे हे जखमी झाले हाेते.

Crime News, Nagar, Pathardi, Devrai
आळंदीस निघालेल्या वारकऱ्यांच्या वाहनाचा झाला भीषण अपघात; एक ठार, 28 जखमी

दरम्यान जखमींपैकी अजय पालवे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात पोलीस (police) दाखल झाले. मात्र बराच वेळ तणावाचं वातावरण होतं. दरम्यान संशयित आरोपींना तातडीने ताब्यात घेण्याची मागणी करत संतप्त नागरिकांनी नगर-पाथर्डी महामार्ग (nagar pathardi highway) दोन तास अडवून धरला होता. पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं असून पाथर्डी पोलीस ठाण्यात (pathardi police station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Crime News, Nagar, Pathardi, Devrai
'अग्निपथ' ला विराेध करण्यास जमलेल्या युवकांना पाेलीसांनी घेतलं ताब्यात
Crime News, Nagar, Pathardi, Devrai
Pandharpur Wari: पायी वारीचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी येणार 'माऊली' गावात

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com