Accident News : भरधाव कारचा टायर फुटला, तीन दुचाकींना उडवलं; एक ठार, तिघे गंभीर जखमी

पाेलिस अपघाताचा तपास करीत आहेत.
Aurangabad Accident News
Aurangabad Accident Newssaam tv

- नवनीत तापडिया

Aurangabad News : औरंगाबाद (Aurangabad) नजीक एका कारचा टायर फुटल्याने रस्त्यावरुन निघालेल्या तीन दुचाकींना ठाेकर दिली. ही ठाेकर इतकी भीषण हाेती की तिन्ही दुचाक्या हवेत उडाल्या. या विचित्र अपघातात (accident) एक जण ठार झाला आहे तर तिघे जण गंभीर जखमी (injured) झाले आहेत.

Aurangabad Accident News
Kokan News : काेकणात 'Pushpa' स्टाईल चाेरी, लाकडांसह दाेन ट्रक जप्त; राजकीय वर्तुळात खळबळ

ही घटना खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर जवळील पाळीचा मळा या ठिकाणी मंगळवारी घडली. एका भरधाव कारचे टायर फुटल्याने कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून तीन दुचाकींना कारने जोराची धडक दिली.‌

Aurangabad Accident News
Parbhani News: रील बनवणं बेतले जीवावर, दाेन विद्यार्थ्यांचा मृत्यू; डाकू पिंपरी गावावर शाेककळा (व्हिडिओ पाहा)

या अपघातात हनीफ यासीन पठाण यांचा मृत्यू झाला. या अपघातात राजू देविदास सोनवणे, चैताली राजू सोनवणे व जयश्री प्रवीण काळे हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा तपास पाेलिस (police) करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com