Breaking : देवदैठणमध्ये थरार, गोळीबारात एकाचा मृत्यू

Breaking : देवदैठणमध्ये थरार, गोळीबारात एकाचा मृत्यू
क्राईम लोगो

संजय आ. काटे

श्रीगोंदे : पारनेर तालुक्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. मागील महिन्यातच पॅरोलवर सुटलेल्या कैद्याचा निर्घृण खून झाला होता. त्या घटनेनंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. त्यानंतरही श्रीगोंदा तालुक्यात गोळीबाराची घटना घडली आहे. परंतु मृत व्यक्ती पारनेर तालुक्यातील आहे.

पिंपळनेर (ता. पारनेर) येथील पाडूरंग जयवंत पवार (वय ५२) या व्यक्तीच्या डोक्यात गोळी घालून खून करण्याची थरारक घटना देवदैठण (ता. श्रीगोंदे) येथे घडली. वैयक्तीक कारणातून हा खून असल्याचा पोलिसांनी प्राथमिक संशय व्यक्त करीत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.One person died at Devdaithan

क्राईम लोगो
Satara Live : आशिष शेलार शिवेंद्रसिंहराजेंच्या वाड्यात

मयत पवार यांची पिंपळनेर येथे शेती असून त्यांच्यावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली. देवदैठण येथील शिरुर, बेलवंडी रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आला. मिळालेल्या माहितीनूसार, हा खून तेथेच डोक्यात गोळी घालून करण्यात आला आहे. डोक्याच्या पाठीमागच्या बाजूने गोळी घातली गेली. ती आरपार गेल्याने पवार यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी पोलिस पुणे येथील ससून रुग्णालयात मृतदेह घेवून गेले आहेत.

बेलवंडीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे म्हणाले, हा खून असून कोणत्या कारणातून ही हत्या झाली. याची माहिती घेत आहोत. याच घटनेवरून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती घेत आहोत.One person died at Devdaithan

दरम्यान पोलिस घटनास्थळ व एका हॉटेलमधील सीसिटिव्ही फुटेज तपासत आहे. या घटनेचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com