रायगडात 1 हजार मद्याचे बॉक्स जप्त; 82 लाखांचा मुद्देमाल जप्त

रायगड विभागात एवढा मोठा साठा मुंबई विभागाने पकडला असून दोन वर्षातील ही सर्वाधिक मोठी कारवाई आहे.
रायगडात 1 हजार मद्याचे बॉक्स जप्त; 82 लाखांचा मुद्देमाल जप्त
रायगडात 1 हजार मद्याचे बॉक्स जप्त; 82 लाखांचा मुद्देमाल जप्त Saam TV

राजेश भोस्तेकर

रायगड महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मुंबई विभागाच्या पथकाने गोवा बनावटीची विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर मुंबई गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील गडब येथे मध्यरात्री कारवाई करून ट्रकसह 82 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबई विभागाच्या या कारवाईत ट्रक चालक मोहम्मद असिफ (23), क्लिनर पवन कुमार माहतो (21), जयेश भावसार (25) अशी आरोपीची नावे आहेत. पकडलेल्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उत्पादन शुल्क विभागाकडून हे मद्य कुठे घेऊन जाणार असल्याबाबत चौकशी सुरू आहे. रायगड विभागात एवढा मोठा साठा मुंबई विभागाने पकडला असून दोन वर्षातील ही सर्वाधिक मोठी कारवाई आहे. गोवा बनावटीची विदेशी मद्याची वाहतूक मुंबई गोवा महामार्गावर रायगड हद्दीतून होत असताना रायगड उत्पादन शुल्क विभाग मात्र झोपले होते का असा प्रश्न या कारवाईनंतर उपस्थित झाला आहे.

रायगडात 1 हजार मद्याचे बॉक्स जप्त; 82 लाखांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकांना लाच घेताना अटक!

मुंबई गोवा महामार्गावर गोवा राज्यातून मुंबईकडे टाटा कंपनीचा एम एच 06/ एक्यू 5846 या ट्रकमधून विदेशी बनावटीच्या मद्याची वाहतूक होणार असल्याची खबर मुंबई भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार 13 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पेण तालुक्यातील मौजे खारडोंबि गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गवरील गडब येथील ग्रीन पार्क फॅमिली रेस्टरटसमोर मुंबई पथकाने सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ट्रक आला असता पथकाने ट्रक अडवून तपासणी केली. पथकाने तपासणी केली असता ट्रकमध्ये 180 मिलीच्या रॉयल ब्लु व्हिस्कीच्या 48 बाटल्यांनी भरलेले 380 बॉक्स, 180 मिलीच्या गोवा व्हिस्कीच्या 48 बाटल्यांनी भरलेले 620 बॉक्स, 3 मोबाईल तर दारू लपविण्यासाठी सिमेंटचे तुकडे आणि ताडपत्री आणि ट्रकसह 82 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप याचे आदेशानुसार कोकण उप आयुक्त सुनील चव्हाण, संचालक उषा वर्मा याच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संताजी लाड, मनोज चव्हाण, अशोक तारू, पी एस कांबळे, अमोल चिलगर, धनाजी दळवी, सुभाष रणखांब, अविनाश जाधव, प्रवीण धवणे या पथकाने केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.