Beed News: घरबसल्या पेन्सिल विक्री व्यवसाय जाहिरातीपासून सावधान; पैसे कमवण्याच्या नादात लाखोंची फसवणूक

पेन्सिल तयार करण्याची सामग्री देण्याचे आश्वासन दिले आणि घरबसल्या पेन्सिल विक्रीचे आमिष दाखवले.
Beed News
Beed NewsSaam TV

Beed News: बीड जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर ठाणे नव्या वर्षात अधिक अॅक्टिव्ह करण्यात आले आहे. घरबसल्या पेन्सिल विक्रीचा उद्योग करण्याचे आमिष दाखवून, बीडच्या केज तालुक्यातील एकास तब्बल दीड लाखांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आलाय. सायबर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. (Latest Beed News)

संतोष मोहन ठोंबरे (रा. केज) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. इन्स्टाग्रामवर त्यांना घरबसल्या रोजगाराची जाहिरात दिसली. त्यावरील क्रमांकावर संपर्क केला असता ३ ते ४ जानेवारी या दरम्यान सायबर भामट्याने त्यांना पेन्सिल तयार करण्याची सामग्री देण्याचे आश्वासन दिले आणि घरबसल्या पेन्सिल विक्रीचे आमिष दाखवले.

त्यासाठी टप्प्याटप्प्याने वेगवेगळी कारणे देत त्याने दीड लाख रुपये लुबाडले. यावेळी तक्रारदाराने खातरजमा न करता पैसे भरले. मात्र नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रार देण्यात आली. दरम्यान याप्रकरणी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस ठाण्यात याविषयीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Beed News
Cyber Crime: बॅंक खात्‍यातील पैसे वाचविण्यासाठी गमावले एक लाख १६ हजार; अनोळखीला सांगितला ओटीपी

घर बसल्या पैसे कमवता यावेत असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र तसे प्रत्यक्षात शक्य नाही. फक्त पेन्सिल बनवून महिना २० ते ३० हजार कमवा अशा पद्धतीच्या अनेक जाहिराती माध्यमांवर पाहायला मिळतात. मात्र अशा पद्धतीच्या कामांमध्ये आजवर अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने नागरिकांना या बाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे.

Beed News
Cyber Crime: फेसबुकवर मैत्री पडली महागात; वाढदिवस गिफ्टच्‍या नावाने फसवणूक

सायबर हल्ल्याच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लाईट बिल भरणे, बॅंक, आधारकार्ड अशी विविध कारणे सांगून मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवत आजवर लाखो व्यक्तींना गंडा घालण्यात आला आहे. त्यामुळे सायबर ठाणे नव्या वर्षात अधिक अॅक्टिव्ह करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com