ऑनलाईन चोरीचा नवा प्रकार; वस्तू मागवून सामानांची अदलाबदल!

आजकाल ऑनलाईन वस्तू खरेदी करण्याचं चलन वाढलं आहे. पण आता देखील अफरातफर करण्याची शक्कल नागपूरच्या एका तरुणाने शोधून काढली होती
ऑनलाईन चोरीचा नवा प्रकार; वस्तू मागवून सामानांची अदलाबदल!
ऑनलाईन चोरीचा नवा प्रकार; वस्तू मागवून सामानांची अदलाबदल!मंगेश मोहिते

मंगेश मोहिते

नागपुर: आजकाल ऑनलाईन वस्तू खरेदी करण्याचं चलन वाढलं आहे. पण आता देखील अफरातफर करण्याची शक्कल नागपूरच्या एका तरुणाने शोधून काढली होती; आणि बऱ्याचदा वस्तू मागवून कंपन्यांना चुना देखील लावण्यात तो यशस्वी देखील झाला. पण नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी सापळा रचून त्या तरुणाला अटक केली आहे.

हे देखील पहा-

आरोपीची शक्कल;

आरोपी पवन ऑनलाइन साईड वरून महागड्या डिजिटल गोष्टी ऑर्डर करायचा. ते सामान घेऊन डिलिव्हरी बॉय डिलीव्हरी द्यायला आला की, त्याला 5 मिनिटं थांबवून सामान बघतो म्हणून आपल्या गाडीत बसून त्यातील सामान काढून घेत असे. आणि कंपनीसारखी पॅकिंग करून परत त्यात साबण सारख्या वस्तू भरून, सध्या आपल्याकडे पैसे नसल्याच कारण देत त्या वस्तू डिलीव्हरी बॉयच्या हाताने परत करत असे.

ऑनलाईन चोरीचा नवा प्रकार; वस्तू मागवून सामानांची अदलाबदल!
काबूल विमानतळावरून 150 भारतीयांचे अपहरण ?

असा गोरख धंदा पवन श्रीपाल नावाचा तरुण करत होता, मात्र याची तक्रार अंबाझरी पोलीस Ambazari Police स्टेशन मध्ये दाखल होताच पोलिसांनी या चोराचा आणि त्याच्या अनोख्या गुन्हेगारीचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकत पवन कडून आय पॅड, हेडफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट पकडून जवळ जवळ 8 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्याचा मास्टर माईंड कोण आहे, कुठल्या उद्देशाने पवन ह्या गोष्टी करायचा याचा तपास पोलीस करत आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.