MIT विद्यापीठाकडून खा.साध्वी प्रज्ञा यांचे वेबिनार; वादाची शक्यता

सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या, शहिद हेमंत करकरे यांचा अपमान करणार्‍या लोकांना मार्गदर्शन करायला लावून एमआयटीला काय साध्य करायचं आहे? विद्यार्थी संघटनांचा सवाल
MIT विद्यापीठाकडून खा.साध्वी प्रज्ञा यांचे वेबिनार; वादाची शक्यता
MIT विद्यापीठाकडून खा.साध्वी प्रज्ञा यांचे वेबिनार; वादाची शक्यता SaamTv

पुणे : शैक्षणिक क्षेत्रातील नावाजलेले विद्यापीठ 'एमआयटी' सध्या नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. कारण, एमआयटी च्या 'एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट' या विभागांतर्गत मालेगाव बाँम्बस्फोटातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा यांचे वेबिनार मध्ये ऑनलाईन मार्गदर्शन आज आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे एमआयटी विद्यापीठाला अश्या व्यक्तीस विद्यार्थ्यांना मार्गर्शन करण्यास बोलवून नेमके काय सध्या करायचे आहे? असा सवाल शहरातील विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे.

हे देखील पहा -

एमआयटी विद्यापीठांतर्गत विविध कोर्सस चालवण्यात येतात. त्यातीलच हा 'एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट' (SOG) नावाचा कोर्स विद्यार्थ्यांना राजकीय नेतृत्व घडवण्यासंबंधी शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याचे काम करतो. या कोर्सच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि संस्कृतिक क्षेञातील देशभरातील दिग्गज मान्यवरांना याठिकाणी विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शनासाठी बोलावण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून एमआयटी मध्ये भारतीय छाञ संसद हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा देखील मोठा प्रतिसाद आहे. देशभरातले विद्यार्थी नेतृत्वाचे पैलू विकसित करण्याचे ध्येय घेऊन येथे प्रवेश घेत असतात.

MIT विद्यापीठाकडून खा.साध्वी प्रज्ञा यांचे वेबिनार; वादाची शक्यता
धुळ्यातील दगडफेक..पन्‍नास कार्यकर्त्यांवर गुन्‍हा दाखल

खा.साध्वी प्रज्ञा या 2008 मधील मालेगाव बाँम्बस्फोटातील आरोपी असुन त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. एमआयटीला सदर व्यक्तीची पार्श्वभुमी माहीत असूनही मार्गदर्शनास बोलावून कोणता अजेंडा राबवायचा आहे असा सवाल देखील विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे. कुठल्याही शैक्षणिक संस्था मुळातच संवैधानिक विचारांची केंद्र बनने अपेक्षित आहे. त्यामुळे सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या, शहिद हेमंत करकरे यांचा अपमान करणार्‍या अशा वादग्रस्त व्यक्तीस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला लावून एमआयटीला काय साध्य करायचं आहे? असा सवाल स्टुडंट हेल्पिंग् हॅंड्स संस्थेचे कुलदीप आंबेकर यांनी उपस्थित केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com