'फक्त मुख्यमंत्र्यांचे अच्छे दिन, राज्यातील जनतेचे बुरे दिन'; दानवेंची उद्धव ठाकरेंवर टीका

'एका मुख्यमंत्री पदासाठी सर्व आमदार खासदार नाराज असून हे काय आमचे कोथळे काढतील.'
'फक्त मुख्यमंत्र्यांचे अच्छे दिन, राज्यातील जनतेचे बुरे दिन'; दानवेंची उद्धव ठाकरेंवर टीका
Uddhav Thackeray/Raosaheb DanaveSaam TV

जालना : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजपने ओबीसी आरक्षणाचा खून केल्याची टीका केली होती. या टीकेला रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिलं ते म्हणाले, जे राज्य सरकार २ वर्षात इम्पेरीकल डाटा देऊ शकलं नाही ते सात महिन्याते कसं देणार? असा प्रश्न दानवे यांनी छगन भुजबळ यांच्यासह राज्य सरकारवर उपस्थित केला. तसंच राज्य सरकारमधील सर्व ओबीसी मंत्री हे शोभेच्या वस्तू असून ओबीसींवर अन्याय करणं हे राज्य सरकारचं धोरण असल्याचा आरोप देखील दानवे (Raosaheb Danve) यांनी केला. ते आज जालन्यातील (Jalna) आयोजित पत्रकार परीषदेत बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अच्छे दिन आले नसल्याचं म्हटलं होतं, यावर देखील दानवे यांनी भाष्य केलं. भाजपला धोका देऊन यांनाच अच्छे दिन आले असून राज्यातील १२ कोटी जनतेला मात्र बुरे दिन आल्याचं दानवे म्हणाले. जो मुख्यमंत्री मंत्रालयात २ वर्ष जात नाही. त्यांच्यासाठी हे अच्छे दिन असून जनतेसाठी बुरे दिन असल्याचं देखील दानवे म्हणाले.

तसंच आम्ही राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पुढे आणलं नसून ते फक्त भाजपच्या बाजूने बोलले असंही ते म्हणाले. याशिवाय भाजपचं कर्तृत्व पाहून राज ठाकरे आमच्या बाजूने बोलले असल्याचं दानवे म्हणाले. राज ठाकरे यांची मुंबईत त्यांच्याच फोनवरून झालेली भेट होती. त्यांनी अयोध्येला जाण्यासाठी रेल्वे गाड्या मागितल्या होत्या. त्यासाठी ही भेट झाली असंही ते म्हणाले याशिवाय या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असंही ते म्हणाले.

Uddhav Thackeray/Raosaheb Danave
देवाला माझ्या दोन प्रार्थना, पहिली...; केजरीवालांनी नागपुरात बड्या नेत्यांना डिवचलं

दरम्यान, मी ब्राम्हण मुख्यमंत्री पाहू इच्छितो या वक्तव्याचं देखील दानवे यांनी समर्थन केलं. जालन्यातील त्या कार्यक्रमात माझ्या आधीच्या वक्त्याने जालना पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त वार्डात ब्राह्मणांना तिकिटं द्या; अशी मागणी केली होती. म्हणून आपण ते वक्तव्य केल्याच दानवे म्हणाले. देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले असते पण दगाफटका झाला त्यांना येणाऱ्या निवडणुकीत लोक जागा दाखवतील असा इशारा देखील दानवे यांनी शिवसेनेला दिला.

भाजप आम्हाला दगाफटका देत असेल तर आम्ही त्यांचा कोथळा काढू असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय यावर देखील दानवे यांनी भाष्य केलं.यांच्या एका मुख्यमंत्री पदासाठी सर्व आमदार खासदार नाराज असून हे काय आमचे कोथळे काढतील, निवडणुकीत आम्हीच यांचे कोथळे काढू असा इशारा दानवे यांनी दिला.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.