Good News |गोंदिया जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, जिल्ह्यात फक्त ३ ॲक्टिव्ह रूग्ण

गोंदिया जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. जिल्ह्यातील 934 गावे कोरोनामुक्त झाली असून जिल्ह्यात आता फक्त तीन ॲक्टिव्ह रूग्ण आहेत.
Good News |गोंदिया जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, जिल्ह्यात फक्त ३ ॲक्टिव्ह रूग्ण
Good News |गोंदिया जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, जिल्ह्यात फक्त ३ ॲक्टिव्ह रूग्णSaam Tv News

गोंदिया: मागील दोन महिन्यांत जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला आहे, त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या आता तीनवर आली आहे. जिल्ह्यातील 936 गावांपैकी 934 गावे पूर्णपणे कोरोनामुक्त झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना ॲक्टिव रुग्ण गोंदिया येथे होते, त्यामुळेच हा गोंदिया तालुका कोरोनाचे हॉटस्पाॅट झाला होता. मात्र, आता हा तालुकासुद्धा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. (Only three active patients in Gondia district, it will be covid negative district soon)

हे देखील पहा -

सालेकसा आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केवळ दाेन गावांत कोरोनाचे तीन रुग्ण आहेत. त्यामुळे हा तालुकासुद्धा लवकरच कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. हे रुग्ण बरे झाल्यास जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होणार आहे. तब्बल दीड वर्षानंतर जिल्हा कोरोनामुक्त होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 41 हजार 194 कोरोनाबाधित आढळले, त्यापैकी 40 हजार 485 बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन आणि जिल्हावासीयांनी घेतलेली काळजी यामुळेच जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे म्हटल्यास वावगे होणार नाही.

Good News |गोंदिया जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, जिल्ह्यात फक्त ३ ॲक्टिव्ह रूग्ण
जालन्यात भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला काँग्रेस आमदाराची हजेरी

जिल्ह्यातील दोन रुग्णांचे नमुने डेल्टा प्लसच्या अनुषंगाने तपासणीत पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने या दोन्ही गावांतील रुग्णांचे नमुने तपासणी करण्यात आली. यापैकी सर्वांचे नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.