Eknath Shinde News: ‘ऑपरेशन विजय’मधील शहीद सैनिकांचा पराक्रम ऊर्जा आणि प्रेरणा देणारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी द्रास युद्ध स्मारकाला भेट दिली
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSaam tv

Eknath Shinde News:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी द्रास युद्ध स्मारकाला भेट दिली. त्यानंतर ‘ऑपरेशन विजय’ मधील शहीदांच्या स्मृतीला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. 'द्रास युद्ध स्मारकाला दिलेली भेट प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी आहे. तसेच ही भेट देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत करणारी आहे, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री शिंदे रविवारपासून काश्मीर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांनी कारगिल जिल्ह्यातील द्रास युद्ध स्मारकाला भेट दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी या मॅरेथॉनमधील स्पर्धकांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धकांचा आणि द्रास येथे कर्तव्य बजावणाऱ्या जवानांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला आहे.

Eknath Shinde News
Ganpati Festival 2023: गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कारगिल युद्धा पाकिस्तानला आपल्या जवानांनी चोख उत्तर दिल्याचा उल्लेख केला. या युद्धात अनेक जवाद शहीद झाले. या जवानांची महती द्रास स्मारकाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

‘सरहद’ संस्थेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये चांगले काम सुरू आहे. त्यांच्या कार्याला आणि सैनिकांच्या देशसेवेला मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला, असे सांगून प्रधानमंत्री मोदी यांना मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांचा लष्करी जवानांशी संवाद

साताऱ्याच्या कुमार पिसाळ यांच्या जागृती मोहिमेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील चोराडे गावातील कुमार पिसाळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

१० वर्षांपूर्वी रेल्वे अपघातामध्ये पिसाळ यांनी पाय गमावला. तरीही जिद्दीच्या आधारे सातारा ते संपूर्ण भारतभ्रमण करण्यासाठी दुचाकीवरून निघाले आहेत. या भ्रमणादरम्यान दिव्यांग सक्षमीकरण आणि जनजागृती त्याचबरोबर रस्ता सुरक्षिततेच्या नियमांबद्दल जागृती करीत आहेत, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com