"दिवस मोजण्याचं काम विरोधकांना ५ वर्षे करावं लागेल" - शरद पवार

दिवस मोजण्याचं काम विरोधकांना ५ वर्षे करावं लागेल असा टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला आहे, नाशिकमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
"दिवस मोजण्याचं काम विरोधकांना ५ वर्षे करावं लागेल" - शरद पवार
"दिवस मोजण्याचं काम विरोधकांना ५ वर्षे करावं लागेल" - शरद पवारSaam Tv

नाशिक: महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, दिवस मोजण्याचं काम विरोधकांना 5 वर्षे करावं लागेल असा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला आहे, नाशिकमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजलीही अर्पण केली आणि विविध विषयांवर भाष्य केले. ("Opponent will have to count the days for 5 years" - Sharad Pawar criticise to opposition)

हे देखील पहा -

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली देताना ते म्हणाले की, नव्या पिढीला इतिहास साध्या भाषेत समजावण्यासाठी काम बाबासाहेब पुरंदरेंनी केलं. इतिहासासंबंधी नव्या पिढीत आस्था निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं, त्यासाठी महाराष्ट्रभर त्यांनी दौरे केले. बाबासाहेब दीर्घायुषी होते, महाराष्ट्राच्या नव्या पिढीला इतिहास समजावा यासाठी काळजी घेतली. शिवछत्रपतींच्या इतिहासावरून काही वादही झाले, मात्र त्यावर बोलण्याइतका मी इतिहास अभ्यासक नाही. संपूर्ण आयुष्य ज्यांनी या कामात घातलं त्यांच्याबद्दल अशा बदनाम्या केल्या जाता ते यांच्या बाबतही घडलं असावं. तसेच भाजप विरोधी नेतृत्वाबाबत ते म्हणाले की, इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेंव्हा त्यांच्या विरोधातही नेतृत्व नव्हतं, मात्र सगळ्या शक्ती मोरारजी देसाई मागे उभ्या राहिल्या. त्यामुळे विरोधी पक्षाकडे चेहरा नाही असं म्हणता येणार नाही.

निवडणुका डोळ्यांसमोर जाणीवपूर्वक हिंसाचार

अमरावती हिंसाचाराबाबत ते पवार म्हणाले की, त्रिपुरात घडलं म्हणून महाराष्ट्रात असं घडणं योग्य नाही. महाराष्ट्रात काही संघटना अशा घटना करतात हे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्या भागात या घटना घडल्या, या प्रवृत्तींना किती महत्व द्यायचं हे लोकांनी ठरवावं. राज्य सरकार चांगलं काम करत असतांना, नैराश्यातून सार्वजनिक शांततेला धक्का बसेल असं काम काही राजकीय पक्षांचे घटक करतायत, हे दुर्दैव. तीन चार राज्याच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे जाणीवपूर्वक केलं आहे, याचा फटका सामान्यानांच बसतो. राज्यातील मंत्र्यांच्या केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या चौकशांबाबत पवार म्हणाले की, अधिकाऱ्यांचा यासाठी वापर केला जातो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यात सहभाग आहे.

शोषित लोकांना मुख्य प्रवाहात आणून बदल घडेल

नक्षलवादाबाबत पवार म्हणाले की,नक्षलवाद ट्रेंड महाराष्ट्रत वाढतोय असं नाही. खरोखरच नक्षलवादी विचार ज्यांनी विचार स्वीकारले तो वेगळा आहे, असा वर्ग फक्त महाराष्ट्रात आहे असं नाही. आदीवासींवर काही अन्याय झाला असेल तर त्यांना नक्षलवादी ठरवता, मात्र यावर बॅलन्स ठेवायला हवा. माझ्या दृष्टीने केवळ कायदा सुव्यवस्था प्रश्न नाही, शोषित लोकांना मुख्य प्रवाहात आणून बदल घडेल. पोलीस बळाचा वापर करूनच हा प्रश्न सुटेल असं बोलणं हे असत्य आहे. तिकडे विकास करायला हवा त्यांना संधी द्यायला हवी.

एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण शक्य नाही, असं प्राथमिक दृष्ट्या तरी दिसतंय.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शरद पवार म्हणाले की, तुम्ही जिथे आहात तिथे प्रश्न सोडवले पाहिजे. दुसरीकडे वर्ग करून प्रश्न सोडवा असं म्हणणे अयोग्य. न्यायालयाने देखील याबाबत स्पष्ट भूमिका दिलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण शक्य नाही, असं प्राथमिक दृष्ट्या तरी दिसतंय. कामगार संघटना आणि राज्य सरकारने एकत्र बसून यावर तोडगा काढावा. एकादशीला असंख्य लोक वारीला जातात, आज त्यांचेही हाल झाल्याने आस्थेला धक्का बसविण्याच काम केलं जातंय. अभिनेते विक्रम गोखलेंच्या वक्तव्याबाबत ते म्हणाले की, अशा लोकांच्या वक्तव्याची नोंद घ्यावी असं मला वाटत नाही.

"दिवस मोजण्याचं काम विरोधकांना ५ वर्षे करावं लागेल" - शरद पवार
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे राज ठाकरेंनी घेतले अंत्यदर्शन

दिवस मोजण्याचं काम विरोधकांना 5 वर्षे करावं लागेल

महाविकास आघाडी सरकारबाबत पवार म्हणाले की, आम्ही जर ठरवून घेतलं आहे की, जुळवून घ्यायचं त्यामुळे हे सरकार सुरू आहे. आज सरकार जाईल, उद्या जाईल दिवस मोजायचं काम त्यांना (भाजपला) करावं लागेल. महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, दिवस मोजण्याचं काम विरोधकांना 5 वर्षे करावं लागेल असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com