'भटके विमुक्त' खात्याच 'बहुजन विकास' नामांतराला माझा विरोध - संजय राठोड (पहा व्हिडिओ)
'भटके विमुक्त' खात्याच 'बहुजन विकास' नामांतराला माझा विरोध - संजय राठोड (पहा व्हिडिओ)Saam Tv

'भटके विमुक्त' खात्याच 'बहुजन विकास' नामांतराला माझा विरोध - संजय राठोड (पहा व्हिडिओ)

बंजारा समाजाच्या 25 मागण्यांसाठी राज्यभर फिरणार आणि मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ घेऊन भेटायला जाणार असे देखील ते यावेळी म्हणाले.

सोलापूर - माजी वनमंत्री संजय राठोड Sanjay Raut हे दोन दिवसांच्या सोलापूर Solapur दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील मुळेगाव तांड्यातील सहविचार सभेला आज ते मार्गदर्शन करत होते. बंजारा समाजाच्या 25 मागण्यांसाठी राज्यभर फिरणार आणि मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ घेऊन भेटायला जाणार असे  देखील ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने 'भटके विमुक्त' खात्याचे नामकरण 'बहुजन विकास' केले आहे.

हे देखील पहा -

इंग्रज्यांच्या काळापासून 'भटके - विमुक्त' असा शब्दप्रयोग होतो. त्यामुळे तेवढी तरी आस्था ठेवायला हवी होती. त्यामुळे या नामांतराला विरोध असल्याची भूमिका ही माजी वनमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली आहे.मात्र,मंत्रिमंडळात पुनःश्च समावेश याबद्दल बोलणे त्यांनी यावेळी टाळले. दरम्यान, बंजारा समाज बांधवांच्या वतीने मोठ्या जल्लोषात मुळेगाव तांड्यात  माजी वनमंत्री संजय राठोड यांचे जंगी स्वागत  केल्याचे पहायला मिळाले.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com