केतकी चितळेच्या पोस्टवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले...

केतकी चितळेला या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
केतकी चितळेच्या पोस्टवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Devendra FadnavisSAAM TV

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधातील आक्षेपार्ह भाषेतील पोस्ट फेसबुकवर शेअर केल्यानं मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) वादात सापडली आहे. केतकी चितळेवर राज्यभरातून टीका होत आहे. केतकी विरोधात पोलिसात गुन्हाही दाखल झाला आहे, या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे.

कुठल्याही जेष्ठ नेत्यांबद्दल काय भाषा वापरतो याच भान पाहिजे. सोशल मीडियावर तर अतिशय खालच्या पातळीवरचे शब्द वापरले जातात अशी भाषा कुणीही वापरू नये. असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) म्हणाले.

Devendra Fadnavis
ही मानसिक विकृती, तिला वेळीच आवर घालायला हवा; केतकी चितळेवर राज ठाकरे भडकले

देवेंद्र फडणवीस ओवेसी यांच्यावर बोलताना म्हणाले, हे खपवून घेतले जाणार नाही. छत्रपती संभाजीराजे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांचे छळ करणारा औरंगजेब हरामखोर सुलतान याच्या कबरीवर जाणं म्हणजे हिंदूंचा नव्हेतर मुस्लिमांचाही अपमान आहे, असं फडणवीस म्हणाले.

केतकी चितळेच्या पोस्टवर शरद पवार यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. पवार म्हणाले ''मला त्या प्रकरणाबद्दल माहीत नाही. मला व्यक्तीही माहित नाही आणि तुम्ही काय सांगताय हे देखील माहित नाही. नक्की काय बोलल्या आहेत हे माहिती झाल्याशिवाय त्यावर भाष्य करणे योग्य नाही.''

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com