अमरावती शहरात पुन्हा एकदा संचारबंदीचे आदेश

शहरात सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू
अमरावती शहरात पुन्हा एकदा संचारबंदीचे आदेश
अमरावती शहरात पुन्हा एकदा संचारबंदीचे आदेशअरुण जोशी

अमरावती - शहरात पुन्हा कडक संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. आज होणाऱ्या भाजप (BJP)आणि वंचितच्या राज्यव्यापी आंदोलनाचा अमरावती जिल्हा प्रशासनाने धसका घेतला आहे. शहरात सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पाचपेक्षा जास्त नागरिक बाहेर दिल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान शहरातील बाजार पेठ सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी हा सुधारित आदेश जारी केला आहे.

हे देखील पहा -

अमरातवीत बंदला हिंसक वळण लागून हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अमरावतीमध्ये संचारबंदचे आदेश देण्यात आले होते. भाजपान केलेल्या बंदच्या आवाहनला हिंसक वळण लागलं होतं. आक्रमक आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली होती. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला. त्यामुळे आज होणाऱ्या भाजप आणि वंचितच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जमाबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमरावती शहरात पुन्हा एकदा संचारबंदीचे आदेश
एकविरा देवीच्या दर्शनावरून परतताना भीषण अपघात, 3 भाविकांचा मृत्यू

अकोला जिल्ह्यात तीन दिवसासाठी 144 कलम लागू...

21 ते 23 तारखे दरम्यान अकोला जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून या तीन दिवसात कोणत्याही प्रकारचे आंदोलन, रैली, धरणे , आदी एका ठिकाणी 5 पेक्षा जास्त जमा होता काम नये, हा आदेश अकोला जिल्ह्यातील सात ही तालुक्यात करण्यात आला आहे.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्यात 144 कलम लागून करण्यात आले. जर आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com