"व्यंकटेश"च्या पाच संचालकांच्या मालमत्ता जप्तीचा आदेश

"व्यंकटेश"च्या पाच संचालकांच्या मालमत्ता जप्तीचा आदेश

अहमदनगर : नेवासा तालुक्यातील सोनई येथील व्यंकटेश ग्रामीण पतसंस्थेतील एक कोटी ९३ लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणी पाच संचालकांची शेती व प्लाॅट जप्तीचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिला आहे.

व्यंकटेश पत संस्थेच्या गैरव्यवहार बाबत सुविधा सुविजय सोमाणी रा.बेलापूर (ता.श्रीरामपूर) यांनी सोनई पोलिस ठाण्यात सन २०१८ मध्ये फिर्याद दिल्यानंतर व्यवस्थापक शामसुंदर शंकर खामकर, कर्मचारी गणेश हरीभाऊ गोरे व गणेश अंबादास तांदळे यांना अटक करून सर्व संचालकावर गुन्हा दाखल झाला होता. ठेवीदाराच्या अंदोलनानंतर ४ जून २०२१ रोजी संचालक गोपाल कडेल व तेजकुमार गुंदेचा यांना अटक करण्यात आली. Order for confiscation of assets of five directors of Venkatesh Patsanstha

"व्यंकटेश"च्या पाच संचालकांच्या मालमत्ता जप्तीचा आदेश
ठरलेलं विमान टाळत, राणेंचा प्रवास दुसऱ्या विमानाने; चिपी विमानतळ उद्घाटनाच मानपमान नाट्य थांबता थांबेना !

संस्था व संचालक मंडळ मुदत संपूनही ठेवीदाराच्या ठेवी देत नसल्याने ठावीदाराचे रक्षण म्हणून शासनाच्या वतीने जप्तीचा आदेश काढण्यात आला आहे. आदेशात संचालक अभय शांतीलाल चंगेडिया (शेतजमीन), आनंद अशोकलाल भळगट (प्लॉट,व शेतजमीन), तेजकुमार हिरालाल गुंदेचा (प्लॉट), गोपाल रुपचंद कडेल (प्लॉट) व लक्ष्मण हरिभाऊ राशीनकर ( शेतजमीन) यांची मालमत्ता जप्त केल्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मोर्चा,उपोषण, जागरण गोंधळ आदी अंदोलन करुन जागृती केलेल्या अनेक ठेवीदारांनी जप्तीच्या आदेशानंतर मिठाई वाटप करून आनंद साजरा केला. Order for confiscation of assets of five directors of Venkatesh Patsanstha abn79

जप्त आदेश दिलेल्या मालमत्तेचे नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी अर्जुन यांची नियुक्ती करण्यात आली. मंडल अधिकारी व सोनईच्या कामगार तलाठ्यास सातबारा उताऱ्यावर कब्जा म्हणून शासनाचे नाव लावण्याचा आदेश दिला आहे. अन्य संचालकांवर अटक व जप्तीची टांगती तलवार आहे. चार ते पाच संचालक गायब झाल्याचे समजते.

Related Stories

No stories found.