Bakri Eid: बकरी ईद साजरी करण्याबाबतचे आदेश जारी

बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी
Bakri Eid: बकरी ईद साजरी करण्याबाबतचे आदेश जारी
Bakri Eid: बकरी ईद साजरी करण्याबाबतचे आदेश जारीFlickr

लातूर - जिल्ह्यात कोरोना Corona विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व रुग्ण संख्या विचारात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत बकरी ईद Bakri Eid अत्यंत साधेपणाने साजरी करण्या संदर्भात प्रमाणे आदेश जारी केले आहेत. Order issued to celebrate Bakri Eid

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थिती राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे बकरी ईदची Bakri Eid नमाज मस्जिद अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

राज्यात सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी जनावरे खरेदी करायची असल्यास ऑनलाईन पध्दतीने किंवा दुरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरीकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी असे देखील आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Bakri Eid: बकरी ईद साजरी करण्याबाबतचे आदेश जारी
भल्यामोठ्या सापाबरोबर कारमधून थरारक प्रवास

कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध आणी त्यांनतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनांनुसार इतर निर्बंध कायम राहणार आहे. बकरी ईद या सना निमित्त कोणतीही शिथीलता देण्यात येणार नाही. नागरीकांनी ईदच्या निमित्ताने कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, ,वैद्यकीय शिक्षण विभाग, आरोग्य, पर्यावरण तसेच संबंधित महापालिका,पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करणे नागरिकांना बंधनकारक असणार आहे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com