Osmanabad : कुत्र्याने मटण खाल्लं म्हणून बापाने चक्क मुलीलाच संपवलं

तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे ही घटना घडली आहे.
Osmanabad Crime News
Osmanabad Crime NewsSaam Tv

Osmanabad Crime News : आई-वडील आपल्या मुला-मुलींसाठी काहीही करायला तयार असतात. मुलांना कुठलाही त्रास होऊ नये, याची काळजी ते नेहमी घेत असतात. उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र याला अपवाद ठरणारी एक घटना (Crime News) घडली आहे. कुत्र्याने मटण खाल्लं म्हणून एका बापाने चक्क पोटच्या मुलीवर गोळीबार केलाय. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला.

Osmanabad Crime News
Nashik News : पुराच्या पाण्यात स्कुटीसह तरुणी गेली वाहून; धक्कादायक VIDEO समोर

प्राप्त माहितीनुसार, ही धक्कादायक घटना उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी आई-वडिलांना बेड्या ठोकल्या आहेत.

काजल मनोज शिंदे असं मृत्युमुखी पडलेल्या मुलीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी काजल माहेरी आली होती. काजलच्या आईने मटण बनवलं होतं, पण काजलचे दुर्लक्ष झाल्याने कुत्र्याने हे मटण खाल्लं. त्यानंतर काजल आणि तिच्या आईमध्ये वादावादी झाली.

Osmanabad Crime News
Emraan Hashmi : काश्मीरमध्ये इमरान हाश्मीवर दगडफेक; आरोपीला अटक

याच वादावादीतून रागाच्या भरात काजलचे वडीले मनोज शिंदे यांनी गावठी बंदुकीने तिच्यावर गोळी झाडली. गोळी थेट काजलच्या छातीत घुसल्याने काजळ गंभीरित्या जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखलकरण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर पोलिसांनी काजलचे वडील मनोज शिंदे आणि आईला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. कुत्र्याने मटण खाल्लं म्हणून बापानेच पोटच्या मुलीचा काटा काढल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com