उस्मानाबाद जिल्हा बँक शनिवार व रविवार दिवशी पूर्ण वेळ सुरू राहणार...

शेतकऱ्यांना पीक विमा भरता येण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
उस्मानाबाद जिल्हा बँक शनिवार व रविवार दिवशी पूर्ण वेळ सुरू राहणार...
उस्मानाबाद जिल्हा बँक शनिवार व रविवार दिवशी पूर्ण वेळ सुरू राहणार...कैलास चौधरी

कैलास चौधरी

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा बँक आता शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही पूर्ण वेळ सुरू राहणार असून या संदर्भातील परिपत्रक देखील काढण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पीक विमा भरता येण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम 2021 हि योजना या बँकेमार्फत राबविण्यात येते. Osmanabad District Bank will be full time on weekends ...

हे देखील पहा -

15 जुलै पर्यंत पीक विमा भरून घेण्यासाठी मुदत वाढवण्यात आली असून या दरम्यान सलग सुट्टया आल्यामुळे शेतक-यांची विमा हप्ता भरण्यास अडचण निर्माण होऊ शकते तसेच कोरोना संसर्गामुळे सतत लॉकडाऊन केले जात असल्यामुळे शेतकऱ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन जिल्हा बँकेने शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी बँकेच्या सर्व शाखा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com