शिवसेनेचा मेळावा शिवतीर्थावरच व्हावा हीच आमची इच्छा होती; शिंदे गटातील आमदाराचं वक्तव्य

उद्धव ठाकरेंचा मेळावा शिवतीर्थावर व्हावा हीच इच्छा आमचीही होती की शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हावा
uddhav Thackeray Vs Eknath shinde
uddhav Thackeray Vs Eknath shinde Saam TV

बुलढाणा : अनेक दिवसांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यासाठी उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray vs Eknath Shinde) गटामधील न्यायालयीन लढाई आज अखेर संपली आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून जोरदार जल्लोष सुरु करण्यात आला आहे.

अशातच आता दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची परवानगी न्यायालयाने दिल्यावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हावा, अशी आमचीही इच्छा होती, असं वक्तव्य बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी केलं आहे.

पाहा व्हिडीओ -

आमदार गायकवाड म्हणाले की, ठाकरेंचा मेळावा शिवतीर्थावर (Shivaji Park) व्हावा हीच इच्छा आमचीही होती, तसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सुद्धा आमच्याकडे भावना व्यक्त केल्या होत्या आणि त्यामुळे आम्ही त्यांना जास्त विरोध केला नाही. कारण बाळासाहेबांच स्मारक तिकडे आहे.

तर आमचा मेळावा हा बिकेसी (BKC) संकुलात होईल आमच्या मेळाव्यात बाळासाहेबांचे कडवट विचार ऐकायला मिळतील जे की कुठेही मिळणार नाही असंही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे आधी कट्टर विरोधात बोलणारे निकाल लागताच आपलं वक्तव्य बदलतायत की काय असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com