आरोळेंच्या प्रकल्पात आता अॉक्सीजन निर्मितीही

आरोळेंच्या प्रकल्पात आता अॉक्सीजन निर्मितीही
होगनास इंडियाने जामखेड ग्रामीण आरोग्य प्रकल्पास अॉक्सीजन प्लँट भेट दिला.

अहमदनगर : आरोळे कुटुंबाने कर्जत आणि जामखेडसाठी गेल्या दोन पिढ्यांपासून आरोग्य सेवा दिली आहे. घरचा दवाखाना म्हणून आरोळे कुटुंबाकडे पाहिले जाते. कोविडचा कहर सुरू असताना कोणत्याही प्रकारचे रेमडेसिव्हीर इंजेक्शन न देता रूग्णांना बरे करण्यात या कोविड सेंटरचा मोठा वाटा होता. आरोग्य मंत्र्यांनीही या सेंटरची दखल घेत अशा पद्धतीने उपचार करण्याचा सल्ला दिला होता.

कोणाकडूनही एक रूपयाही न घेता हे कोविड सेंटर आरोळे बंधू-भगिनी चालवित आहेत. या प्रकल्पास अनेक दानशूरांनी मदत केली. आमदार रोहित पवार यांनीही मदतीचा हात दिला. या प्रकल्पास होगनास इंडियाने २६ लाख रुपये किमतीचा हवेतून ऑक्सिजननिर्मिती करणारा प्लॅंट देणगी म्हणून दिला आहे. ही देणगी जामखेडकरांसाठी प्राणवायू ठरणार आहे.

होगनास इंडियाने जामखेड ग्रामीण आरोग्य प्रकल्पास अॉक्सीजन प्लँट भेट दिला.
खळबळजनक ः एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

नगर येथील नवजीवन प्रतिष्ठानच्या पुढाकाराने ही मदत मिळाली. डॉ. रवी आरोळे व डॉ. शोभा आरोळे जामखेडचा आरोग्य प्रकल्प चालवित आहेत. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनील मुरलीधरन यांच्या हस्ते ही देणगी देण्यात आली. कंपनीचे ऑपरेशन डायरेक्टर डॉ. शरद मगर, एच. आर. व ॲडमिन मॅनेजर सुभाष तोडकर, ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे संचालक डॉ. रवी आरोळे, नवजीवन प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार, जयेश कांबळे, भगवान राऊत, असिफ पठाण आदी उपस्थित होते.

जामखेड येथील डॉ. आरोळे हॉस्पिटलचा कोविडच्या रूग्णांना मोठा आधार ठरला. गेल्या वर्षभरात सुमारे तेरा हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. या काळात हॉस्पिटलला ऑक्सिजन व इतर अत्यावश्यक गोष्टींची गरज भासत होती. होगनास इंडियाने सामाजिक बांधिलकी जपत ऑक्सिजननिर्मिती प्लँट देणगी स्वरूपात उपलब्ध करून दिला.

कोरोना काळात रुग्णांची मनोभावे मनोभावे सेवा केली. सेवा देताना अनेक आडचणी निर्माण झाल्या. मात्र त्यावर आपण मात केली. समाजातील विविध घटकांनी मदतची हात दिला. आमदार रोहित पवार खंबीरपणे पाठीशी राहिले.

- डॉ. रवी आरोळे, संचालक, ग्रामीण आरोग्य केंद्र

होगनासमुळे नवजीवन

होगनास इंडियाने कोरोना काळात ‘नवजीवन’च्या समन्वयाने चिचोंडी पाटील येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, निंबळक येथील अनामप्रेम संस्था, एमआयडीसी येथील कामगार कोविड सेंटर यांना बेड व गाद्या, बुऱ्हानगर प्राथमिक आरोग्य केंद्रास कोविड संरक्षणात्मक साहित्याची देणगी दिले आहे. तसेच १८ लाख रुपयांचे तीन व्हेंटिलेटर जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com