गोपीचंद पडळकरांची राज्य सरकार आणि युनियनच्या पदाधिकाऱ्यांवर कठोर टीका

राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांना तुटपुंजे आणि वेळेवर न होणाऱ्या पगारामुळे 28 कर्मचाऱ्यांनी राज्यात आत्महत्या केल्या आहेत.
गोपीचंद पडळकरांची राज्य सरकार आणि युनियनच्या पदाधिकाऱ्यांवर कठोर टीका
गोपीचंद पडळकरांची राज्य सरकार आणि युनियनच्या पदाधिकाऱ्यांवर कठोर टीकाSaam Tv

लातूर: राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांना तुटपुंजे आणि वेळेवर न होणाऱ्या पगारामुळे 28 कर्मचाऱ्यांनी राज्यात आत्महत्या केल्या आहेत. त्यांना राज्य सरकारच्या (State Government) वतीने काहीही मदत केली नाही. उलट महामंडळाच्या बँका सावकारी पध्दतीने कर्ज देऊन लूट करत असल्याच्या आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. ते आज लातुर जिल्ह्यातील औसा इथं एसटी कामगाराच्या मेळाव्यात बोलत होते.

राज्य परिवहन महामंडळाच्या 28 कर्मचाऱ्यांनी पगार वेळेवर मिळतं नसल्याने आत्महत्या केल्या आहेत. यांच्या कुटुंबाला अद्यापही सरकारचा प्रतिनिधी अथवा मंत्री भेटायला गेला नाही. एसटी महामंडळ कडून कोटींवर शासनाला पैसे मिळतात आताच एसटी तोट्यात कशी गेली उत्तर प्रदेशमध्ये थोडे काही झाले तर हेच सरकार महाराष्ट्र बंद करायला निघत उत्तर प्रदेशचे मंत्री सक्षम आहेत. इथं एसटी कर्मचाऱ्यांना बघा असा संताप राज्य सरकारवर व्यक्त केला आहे. एसटी महामंडळ हे करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करायची केंद्र बनलीय 20 हजार बसेस आहेत त्याच्या दुरुस्तीत करोडोचा भ्रष्टाचार आहे यामुळेच पुढार्यांना एसटी कर्मचाऱ्यांना राबवून घ्यायचं आहे असा आरोप केला आहे

गोपीचंद पडळकरांची राज्य सरकार आणि युनियनच्या पदाधिकाऱ्यांवर कठोर टीका
शेतकऱ्यांना खुशखबर! दर महिन्याला 2000 नाही तर मिळवा 3000 हजार रुपये पेन्शन

एसटी महामंडळाच्या युनियन फार सक्षम आहेत या युनियनच्या नेत्याची मुले परदेशात शिकतात तर इथं एसटी कर्मचाऱ्याची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात त्यांना वह्या पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत युनियनचे पदाधिकारी कर्मचाऱ्यांच हित जोपासत नसतील तर त्याला लाजा वाटायला हवं असा तीव्र संताप व्यक्त केला आहे आर्थिक संकटात आहे उलट एसटी महामंडळाच्या बँका सावकारी पध्दतीने कर्जाची वसुली करत असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे दिवाळीचा सण तोंडावर आलाय या कर्मचाऱ्यांनी संपाच हत्यार उपसले तर यास सरकार जबाबदार असेल यासाठी महामंडळ बरखास्त करून शासनात सामावून घ्यावे अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

आता एसटी महामंडळच विलीनीकरण राज्य सरकारमध्ये व्हावे यासाठी युनियन विरहित आंदोलन सुरू केले असून राज्य शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडणार असल्याचा निर्धार आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com