Pandharpur: विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! पंढरपूरात गुढीपाडव्यापासून पदस्पर्श दर्शन

कोरोनामुळे २० मार्च २०२० पासून विठुरायाचे पदस्पर्श दर्शन बंद होते.
Pandharpur
PandharpurSaam TV

पंढरपूर : कोरोनामुळे (Corona) गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले विठ्ठल-रुक्मिणीचे (Vitthal-Rukmini) पदस्पर्श दर्शन गुढीपाडव्यापासून सुरू होणार आहे. यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यामध्ये बैठक पार पडली या बैठकीमध्ये पदस्पर्श दर्शन सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे विठ्ठल भक्तांना थेट गाभार्‍यात जाऊन देवाचे दर्शन घेता येणार आहे. कोरोनामुळे पंढरपूरातील (Pandharpur) विठ्ठल मंदिरात २० मार्च २०२० पासून विठुरायाचे पदस्पर्श दर्शन बंद होते. त्यानंतर गेल्या वर्षी पासून मुखदर्शन सुरू करण्यात आले होते.

Pandharpur
"अजित पवार, दरेकर मुंबई बँक लुटतायत; राज्य सरकार दरेकरांना वाचवतंय"

कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरू करावी अशी वारकऱ्यांची मागणी होती दोन दिवसापूर्वीच मंदिर समितीच्या बैठकीमध्ये ही पदस्पर्श दर्शन सुरू करण्यासंदर्भात ठराव करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक निर्णय घेत विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com