बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी साकारला बियांचा गणपती...

बाप्पांची जागासुद्धा बियाणे बँकेतच निवडण्यात आलेले आहे.
बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी साकारला बियांचा गणपती...
बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी साकारला बियांचा गणपती...Saam Tv

अहमदनगर - पारंपारिक बियाणे संवर्धनातून अकोले Akole तालुक्याला देशात आणि विदेशात ओळख निर्माण करून देणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी जीवापाड जपलेल्या बीज बँकेत Seed Bank विविध प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून गणपती बाप्पा साकारले आहे. बियाणे हेच आपले आयुष्य म्हणून शेतकरी वर्गासाठी दिवसरात्र कष्ट घेणाऱ्या बीजमाता म्हणून नावलौकिक असलेल्या राहीबाई व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी अतिशय कष्टाने आणि कल्पकतेने हे गणपती बाप्पा साकारले आहेत.

हे देखील पहा -

विविध रंगछटा आणि आकार असलेल्या बियांचा अतिशय सुबकतेने त्यांनी वापर केलेला आहे. तृणधान्य गळीतधान्य तेलबिया भाजीपाल्याची विविध बियाणे यांचा त्यांनी वापर केलेला आहे. या कामात त्यांचे नातवंड, मुले आणि सुना यांनी त्यांना मदत केली. बाप्पांची जागासुद्धा बियाणे बँकेतच निवडण्यात आलेले आहे. देश आणि विदेशात मिळालेले पुरस्कार व सन्मान चिन्ह यांचा कल्पकतेने वापर करून सुंदर आरास बाप्पा भोवती तयार करण्यात आली आहे. राहीबाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येत अनेक अडचणींवर मात करून पारंपारिक बियाणे जतन करून ठेवलेली आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com