चित्रकार अक्षय मेस्त्रींनी 16 विटांवर साकारली विठ्ठलाची मनमोहक कलाकृती

चित्रकलेमधून अक्षय मेस्त्री नेहमी वेगवेगळे प्रयोग करत आहेत, आणि त्याला सामाजिक टचही असतो.
चित्रकार अक्षय मेस्त्रींनी 16 विटांवर साकारली विठ्ठलाची मनमोहक कलाकृती
चित्रकार अक्षय मेस्त्रींनी 16 विटांवर साकारली विठ्ठलाची मनमोहक कलाकृतीअनंत पाताडे

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग: नेहमीच वेगवेगळ्या संकल्पना वापरून चित्राच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांची अनोखी विठ्ठल भक्ती समोर आली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांनी 16 विटांचा वापर करून प्रत्येक विटेवर पांडुरंगाचे मनमोहक चित्र रेखाटले असून सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहे.

चित्रकलेमधून अक्षय मेस्त्री नेहमी वेगवेगळे प्रयोग करत आहेत, आणि त्याला सामाजिक टचही असतो. आषाढी एकादशी निमित्त 16 विटेवर वेगवेगळी चित्रे काढण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार 5 जुलै पासून प्रत्येक विटेवर विठू रायाचे आकर्षक चित्र रेखाटले आहे. पुढील काही दिवस वेगवेगळ्या वेष भूषेतील पांडुरंग भक्तांना पाहता येणार आहे.

मागील वर्षी तुळशीच्या इवल्याशा पानावर अप्रतिम विठ्ठलाचे चित्र, शिवाय दीड एकर क्षेत्रात पॉवर ट्रीलरच्या साहाय्याने साकारलेला भव्यदिव्य पांडुरंग अख्या महाराष्ट्राने पाहिला होता. ड्रोन कॅमेराचा वापर करून तयार केलेला तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता. विटेवर साकारण्यात आलेल्या विठ्ठलाच्या चित्रासाठी दररोज अर्धा तास वेळ दिला जात असे. भविष्यात या विटा प्रदर्शनात मांडणार असल्याचा मानस अक्षय याने व्यक्त केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com