पालम नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला एक हाती सत्ता, सत्ताधारी भाजपचा पराभव

पालम नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का
Parbhani Nagar Panchayat elections
Parbhani Nagar Panchayat electionsराजेश काटकर

परभणी - पालम नगरपंचायत निवडणुकीत (Election) सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. 17 पैकी भाजपला (BJP) केवळ 1 जागा मिळाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पालम नगरपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादीने 17 पैकी 10 जागा जिंकल्या आहे. तर रासपचे विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला पाच जागा मिळाल्या.

हे देखील पहा -

पालम नगरपंचायतीवर अनेक वर्षे भाजपाची सत्ता होती. मात्र आता भाजपाला मोठा धक्का बसला आहे. इतर एक जागा भाजप पुरस्कृत उमेदवाराने मिळवली आहे. गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर राष्ट्रवादीला हा मोठा विजय पहिल्यांदा मिळाला आहे.

Parbhani Nagar Panchayat elections
Goa Election: गोव्यातील 'आप'च्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला

पालम नगरपंचायतीत एकूण 17 जागा होत्या त्यापैकी

राष्ट्रवादीने 10

रासप 5

भाजपा 1

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com