
Palghar News : पालघर येथून एक दु:खद बातमी समोर आली आहे. चुलत भावाच्या हळदीत एका तरुणाचा मृत्यू झालाय. हळदीसाठी घरी आलेल्या पाहुण्यांना सोडवण्यासाठी तरुण पालघर येथे गेला होता. रात्री बोईसर येथे परतताना त्याच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. (Palghar Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, चुलत भावाच्या हळदीला आलेल्या पाहुण्यांना घरी सोडण्यास गेलेल्या तरुणाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कैफ इस्रार खान असं मृत तरुणाचं नाव असून तो आपला चुलत भाऊ अल्तमस जुनेद खान याच्या हळदीच्या कार्यक्रमाला बोईसर येथे आला होता. हळदीसाठी घरी आलेल्या पाहुण्यांना सोडवून पालघरला परतताना काळाने त्याच्यावर घाला घातला.
रात्री तीन वाजताच्या सुमारास पालघर बोईसर मार्गावरील उमरोळी येथे कैफच्या गाडीचा टायर फुटला. भरधाव कार रस्त्यालगतच्या भिंतीवर धडकली आणि एका झाडाला धडक दिल्यानंतर कैफ इसरार खान या तरुणाच्या डोक्याला जबर मार लागला. घटना घडल्यानंतर तात्काळ तरुणाच्या मदतीसाठी रस्त्यावरील इतर नागरिक धाऊन गेले. त्याला कारमधून बाहेर घेत रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. मात्र २३ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
एका महिन्यापूर्वीचं लग्न झालं होतं.
तसेच वाहन चालक या अपघातात गंभीर जखमी झाला आहे . जखमी कार चालकावर सध्या पालघरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेत. तर मृत कैफचं एक महिना आधीचं लग्न झालं होतं. कैफच्या मृत्यूने सध्या परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. घरात लग्न कार्य सुरू असताना अपघाताची ही घटना घडली आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.