Mother Killed Baby: नात्याला काळिमा! जन्मताच पोटच्या गोळ्याला आईने संपवले, कारण ऐकून पोलिसही चक्रावले

Mother Killed Newborn Baby: जन्मदात्या आईनेच आपल्या नवजात मुलीची हत्या केली आहे. या महिलेने तिसऱ्या मुलीला जन्म दिला होता.
Mother Killed Baby
Mother Killed Babysaam tv

Palghar Crime News:

पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या नवजात मुलीची हत्या केली आहे. या महिलेने तिसऱ्या मुलीला जन्म दिला होता. मात्र तिला तिसरं आपत्य नको होतं. त्यामुळे तिने गळा दाबून आपल्या मुलीची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ पसरली आहे. (Latest Marathi News)

Mother Killed Baby
Pandharpur Crime News : आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला पाेलीस जबाबदार, अल्पवयीन मुलीच्या पालकांचा इशारा

सदर महिला विवाहित असून ती पालघरमधील घिवली गावात वर्षभरापासून एकटीच राहत होती. तिचा पती आणि दोन मुलं मुंबईत राहतात. महिलेला एक सात वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. तिला तिसरे आपत्य नको होते. त्यामुळे तिने आपल्या बाळाला संपवण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने ३० ऑगस्ट रोजी शासकीय रुग्णालयात बाळाला जन्म दिला. ३ सप्टेंबर रोजी आशा सेवीका महिलेच्या घरी बाळाची चौकशी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी त्या पुन्हा बाळाच्या तब्येतीच्या चौकशीसाठी आल्या. यावेळी बाळ घरी नव्हते.

आशा सेवीकांनी महिलेला बाळ घरी घेऊन येण्यास सांगितले. मात्र महिलेने दिलेल्या उत्तरावरून आशा सेवीकांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. ११ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता आशा सेवीकांनी पोलिसांना याबाबत तक्रार दिली.

पोलिसांनी महिलेच्या घरी येऊन तिची चौकशी केली. यावेळी शेजाऱ्यांशी बातचीत केली असता समजले की, ४ सप्टेंबर रोजी महिला बाळाला घेऊन बाहेर गेली होती. ती जेव्हा घरी आली तेव्हा तिच्याकडे बाळ नव्हते. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं. पुढे चौकशीत आपण आपल्या बाळाची हत्या केल्याचे कबूल केले.

Mother Killed Baby
Bhopal Crime News : सोमवारची रात्र नवऱ्यासाठी ठरली भयानक; १०० रुपये मागितल्यानं बायकोनं दिलं पेटवून

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com