Palghar Mob Violence : पालघरमध्ये त्या घटनेची पुनरावृत्ती टळली! जमावाने दोन साधूंना चोर समजून घेरलं, तेवढ्यात....

दोन साधू गावातून जात असताना हे लहान मुलांना चोरण्यासाठी आले आहेत असा काहींचा समज झाला.
Palghar Mob Violence
Palghar Mob ViolenceSaam TV

Mob Violence : पालघरमध्ये पुन्हा एकदा साधू मॉब लिंचिंगची मोठी दुर्घटना घडणार होती. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली आहे. दोन साधू गावातून जात असताना हे लहान मुलांना चोरण्यासाठी आले आहेत असा काहींचा समज झाला. त्यामुळे नागरिकांनी त्यांना मारण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वेळीच पोलिसांनी या बाबत शहानीशा केल्याने मोठा अनर्थ रोखता आला आहे. (Palghar Crime News)

गेल्या तीन वर्षांपूर्वी पालघरमध्ये अशीच एक घटना घडली होती. या घटनेमध्ये गावात साधूंच्या वेशात काही जण मुलं चोरण्यासाठी आले आहेत असा गावकऱ्यांचा समज झाल्याने सर्वांनी या साधूंवर हल्ला केला होता. हा हल्ला इतका मोठा होता की साधूंचा यामध्ये मृत्यू झाला. पालघरच्या वनगाव पोलीस ठाणे हद्दीत चंद्रनगर गावात या घटनेची पुनरावृत्ती होणार होती.

Palghar Mob Violence
Pune Crime News : संतापजनक! पुण्यात ओला कॅबचालकाचे प्रवासी महिलेशी अश्लील चाळे; गुन्हा दाखल

पोलीस अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास चंद्रनगर गावामध्ये दोन व्यक्ती आल्या होत्या. त्यांना पाहून काही गावकऱ्यांनी हे दोघे लहान बाळांना चोरण्यासाठी आले आहेत असा आरोप केला. त्यानंतर या दोघांच्या भोवताली मोठी गर्दी जमली. या व्यक्ती नेमक्या कोण आहेत याबाबत जमावाने त्यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली.

या दोन्ही व्यक्तींभोवती मोठी गर्दी जमल्यानंतर एका व्यक्तीने लगेचच पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आणि जमलेल्या व्यक्तींना शांत केले. त्यानंतर दोन्ही साधूंना पोलीस स्टेशनला घेऊन जात त्यांची चौकशी केली. या दोन्ही साधूंपैकी एका साधूंनी भगव्या रंगाचा तर दुसऱ्या साधूंनी सफेद रंगाचा पोषाख परिधान केला होता.

Palghar Mob Violence
Pune Crime News : संतापजनक! पुण्यात ओला कॅबचालकाचे प्रवासी महिलेशी अश्लील चाळे; गुन्हा दाखल

दोन्ही साधूंना पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यावर त्यांची चौकशी केली असता समजले की, हे दोन्ही साधू यवतमाळ जिल्ह्यातून पालघरमध्ये आले आहेत. इथे ते फक्त भीक्षा मागण्यासाठी आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी या दोन्ही साधूंची निट चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com