Palghar: मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग प्रकल्प, ठेकेदाराविरोधात पालघरवासी आक्रमक

मोदी सरकारचा महत्वाकांक्षी असलेल्या मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या ठेकेदाराविरोधात पालघरमधील स्थानिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
Palghar: मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग प्रकल्प, ठेकेदाराविरोधात पालघरवासी आक्रमक
PalgharSaam Tv

पालघार : मोदी सरकारचा महत्वाकांक्षी असलेल्या मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या ठेकेदाराविरोधात पालघरमधील स्थानिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आक्रमक झालेल्या नागरिकांनी पालघरमधील खडकोली येथे एकत्र येत या महामार्गाचं काम रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही काळ या भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, वेळीच पोलीस बंदोबस्त तैनात करुन स्थानिकांना पांगवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला (Palghar Mumbai-Vadodara Expressway Work Citizens Of Palghar Are Aggressive Against Contractor).

Palghar
समृद्धी जीवन मल्टिस्टेट घोटाळा प्रकरणात बीड पोलिसांनी महेश मोतेवारला ठोकल्या बेड्या!

पालघर (Palghar) जिल्ह्यात सध्या मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचं काम सुरु झालं असून यासाठी मोठ्या प्रमाणावर दगड आणि मातीचा भराव केला जातोय. मात्र, परवानगी नसताना देखील अनेक ठिकाणी दगड खाणींमध्ये सुरुंग तयार करून स्फोट केले जात असल्याने अनेक घरांना तडे जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

महामार्गाच्या भरावाच काम करताना शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात असल्याचा आरोप यावेळी स्थानिकांकडून करण्यात येतोय. महामार्गाचं काम करत असताना जिल्ह्यात अनेक ठिकाणी नैसर्गिक नाले बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे या द्रुतगती महामार्गाच काम ठेकेदाराकडून नियमबाह्य पद्धतीने केलं जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय.

आक्रमक झालेल्या नागरिकांमुळे खडकोली येथे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यानंतर स्थानिकांचा आक्रमकपणा काहीसा मवाळ झाला. मात्र, ठेका असलेल्या कंपनीवर कठोर कारवाई करावी या मागणीवर स्थानिक अजूनही ठाम आहेत.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com