Palghar : भरधाव कारने ४ वर्षीय चिमुकल्याला चिरडले, काळीज पिळवटून टाकणारा अपघात

पालघर जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे.
Palghar Accident News
Palghar Accident News Saam TV

Palghar Accident News : पालघर जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. पालघर (Palghar) तालुक्यातील देवखोप झरी पाडा येथे भरधाव कारने ४ वर्षीय चिमुकल्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण (Accident) होती की यामध्ये चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. दक्ष दीपक गोवारी (वय ४ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव आहे. (Palghar News Today Live)

Palghar Accident News
Ahmadnagar News : आईनेच पोटच्या मुलीला परपुरूषाशी संबंध ठेवण्यास भाग पाडलं; काळिमा फासणारी घटना

याप्रकरणी पोलिसांनी (Police) कारसह चालकाला ताब्यात घेतलं आहे. प्राप्त माहितीनुसार, देवखोप झरी पाडा येथे ४ वर्षीय दक्ष दीपक गोवारी हा चिमुकला अंगणात खेळत होता. त्याचवेळी नंदोर येथून आबाचा पाडाच्या दिशेने जाणारी भरधाव कार जात होती. भरधाव वेगात जाणाऱ्या या कारने दक्षला जोरदार धडक दिली. (Palghar School News Today)

Palghar Accident News
Viral Video: म्हशीने तरुणीसोबत केलं असं काही; हसून हसून लोटपोट व्हाल!

ही धडक इतकी भीषण होती की कारने दक्षला दूर फरफटत नेले. या भंयकर घटनेत दक्षचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारसह कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. ४ वर्षीय दक्षचा अचानक कार अपघातात मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com